
कोपरगाव : – श्री क्षेत्र कुंभारी येथील नारळी आई देवी मुर्तीस ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व अग्निकुंडात अग्निदेवतेस समीदांची आहुती देत जनकल्याणार्थ प्राणप्रतिष्ठा दि. ३१ जुलै रोजी करण्यात आली. मा. श्री विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते अग्निकुंडात आहुती देण्यात आली. तद्नंतर त्यांनी नारळी आई देवीचे पूजन करून दर्शन घेतले व सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले कि, नारळी आई देवीची महती आदिवासी समाजाच्या गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आली आहे. कै. रंगनाथ लक्ष्मण पवार यांनी या देवीची आयुष्यभर पुजा आर्चा केली व देवत्व टिकवून ठेवले.पंचक्रोशित रंगनाथ बाबा म्हणून त्यांचा नावलौकीक होता. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू, पणतू व समाज बांधवांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.
पुढे श्री.विवेकभैय्या कोल्हे म्हणाले कि, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी माजी. मंत्री. स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी विविध योजना राबविल्या यामध्ये, गणेश स्टेजवर आठ कोटी खावठी कर्ज योजना, गाई जनावरे प्रकरणे, तसेच पालन पोषण करण्यासाठी वन विभागाच्या जमिनी वाटप केल्या, त्याचबरोबर पाणी उपलब्धतेसाठी बंधारे बांधले. शेतीला पाणी देण्याकरिता इलेक्ट्रिक मोटारींची देखील व्यवस्था केली. त्याचबरोबर बियाणे, ऊस बेणे पुरवठा, खत वाटप यासारख्या अनेकविध उपाय योजना त्या काळी साहेबांनी राबविल्या.

तसेच कुंभारी गावावरती आदरणीय साहेबांचे विशेष प्रेम होते, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब व कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचेही विशेष लक्ष आहे. मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात सामाजिक सभागृह, बसथांबा, स्मशानभूमी बैठक शेड व पेविंग ब्लॉक बसवणे ही कामे करण्यात आली असल्याची माहीती मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी नारळी आई देवी भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी, माजी संचालक सर्वश्री शिवाजीराव कदम, विजयराव कदम, सोपानराव चिने, गोपीनाथ निळकंठ, वसंतराव कुलकर्णी, कचेश्वर माळी, सुनिलराव कदम पश्चिम मंडल अध्यक्ष, अरुण पुंडलिक कदम,राजेंद्र बढे, ज्ञानेश्वर चिने, प्रभाकर चिने, उत्तम कदम, नितीन चिने, वैभव कुलकर्णी, शंकरराव चिने, सुरेश चतुर, गजानन कदम, प्रभाकर कदम, शिवाजी सुखदेव कदम, पोपटराव निळकंठ, भागवत कदम, तसेच, कोळगाव थडी येथील पुंजाजी राऊत, शामराव मेहेरखांब, नानासाहेब पंडोरे, बाळासाहेब निंबाळकर,ज्ञानदेव पवार, रामदास पवार, म्हसू पवार, राहुल पवार, नंदू पवार, सुभाष जाधव, गुलाब मोरे, शंकर पवार,गोरख पवार, गोरख जाधव, अमोल बर्डे, भीमराज पवार, नवनाथ माळी, लताबाई जाधव, अलकाताई माळी, कांचनताई मोहरे, आदी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
