
कोपरगाव : – सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पतसंस्थापैकी नावलौकीकास असलेली कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी पतसंस्थेची निवड होऊन कोल्हे कुटुंबास निरंतर साथ देणारे संवत्सर येथील शेतकरी मा. श्री.राजेंद्र सखाहरी परजणे साहेब यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. प्रदीपभाऊ चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने श्रीफल, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. तसेच पुर्व मंडल कोपरगाव तालुका उपाध्यक्ष श्री. किरण आनंदराव चव्हाण व सौ.सुवर्णाताई संदीप भाटे यांची कोपरगाव भाजपा पुर्व मंडल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मा. श्री. महेशभाऊ परजणे तसेच ग्रा. सदस्य श्री. अनिलभाऊ भाकरे उपस्थित राहुन यांनीही संजीवनी सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमन मा. श्री. राजेंद्र परजणे साहेब यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सत्कार मुर्ती मा.श्री.परजणे सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब, माजी. आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब यांनी आमच्यावर सोपविलेले दायित्व आणि टाकलेला विश्वास हि आमची जबाबदारी आहे, त्या अनुसंगाने आम्हीं आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याने पुर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करु. तसेच धोत्रे ग्रामपंचायतीच्यावतीने आमचा जो यथोचित सत्कार केला त्याबद्दल आम्हीं त्यांचे सर्वांचे ऋणी राहु.
या वेळी धोत्रे ग्रामपंचायत सरपंच श्री. प्रदीपभाऊ चव्हाण, उपसरपंच श्री. भाऊसाहेब गागरे, मा. सरपंच नामदेव चव्हाण, मा. सदस्य विजय जामदार, राजेंद्र जामदार, कोपरगाव साई संजीवनी बँक संचालक सुरेश जाधव साहेब, शेषराव शिंदे, संदीप भाटे, ज्ञानदेव आगवन, सुधाकर साखरे, भगवान चव्हाण, जयवंत शिंदे, भारतीताई जामदार, आरतीताई जामदार, तुकाराम शिंदे, सागर गवारे, शरद शिंदे, संतोष चव्हाण, किरण चव्हाण, बाळासाहेब जामदार, भारत चव्हाण आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभाच्या शेवटी मा. श्री. मुकुंद मामा काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.