

संपादक -राजेंद्र तासकर
शासनाच्या ध्येय धोरणानुसार तसेच शासन निर्णय परिपत्र क्र. संकिर्ण २००७/ प्र.क्र. ४८७१वित्त ३ दि.२५ जुन २०१४ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. अपंग २०१५ /प्र.क्र.५५/अ.क्र २ दि.१८/११/२०१५नुसार कोपरगाव नगरपालिका हद्दीतील दिव्यांग तसेच त्यांच्या पाल्यांना विना अट ५o% घरपट्टी व नळ पाणीपट्टी माफी देऊन दिव्यंगांना सहकार्य करावे असे आशेयाचे शिवसेना अपंग सहाय्य सेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री.
बाळासाहेब लांडे यांनी कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेब यांना निवेदन दिले.
निवेदनात पुढे म्हटले कि, कोरोना काळात दिव्यांगांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे त्याचबरोबर अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्याने स्वतः सह कुटुंबाची उपजिविका करणे मुश्किल झाले आहे त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतांनाच आपल्या कार्यालयाकडुन आकारण्यात येणारी घरपट्टी व नळ पाणीपटटी भरणे शक्य नसल्याने त्यांच्या बाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व त्यांना घरपट्टी व नळ पाणीपट्टीमध्ये ५०% माफी देवून सहकार्य करावे त्याचबरोबर शासनाची ” ड ” घरकूल यादी प्रसिध्द झाली असून त्यात अपंगाना प्राधान्य देण्यात आले नसून ते देण्यात येऊन अपंग लाभार्थ्याला त्याचा लाभ त्वरीत देण्यात यावा आणि नगरपालिका स्व:उत्पन्नातुन ५% निधी दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर त्वरीत जमा करण्यात यावा अशा अनेक मागण्या असलेले निवेदन दिव्यांगांच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला दि.११/४/२०२२ रोजी देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना अपंग सहाय्य सेना नगर जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब लांडे,श्री. जावेदभाई खाटीक कोपरगाव तालुकाध्यक्ष,शकीलभाई शेख शहराध्यक्ष,अफजल पठाण शहर उपाध्यक्ष यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.