
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव तालुक्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे ४६४ वीज रोहित्रे ओव्हरलोड झाली हा विरोधकांचा अपप्रचार म्हणजे मांजर स्वतःच मारायची अन त्याच्या काशीचे खापर दुस-याच्या डोक्यावर फोडायचे अशातला प्रकार असल्याची टिका भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे करून वीज प्रश्ननी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,मतदार संघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये आणल्याचा कांगावा करण्यांचा लख्ख उजेड कुठेच पडलेला दिसत नाही असेही ते म्हणाले.
श्री.साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाच वर्षाचा वीज प्रश्नाचा विकासात्मक आराखडा तयार करून त्याच्यावर जाणीवपूर्वक प्रयत्न करून विजेचे सर्व प्रश्न सोडवले म्हणूनच गेल्या पाच वर्षात विजेची समस्या जाणवली नाही.
सौ.स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील तळेगांवमळे,काकडी,संवत्सर, शिंगवे येथील वीज उपकेंद्रासाठी ४ कोटी ७५ लाख,त्याचप्रमाणे कोपरगांव ग्रामिण भागातील १५० तर शहरातील ३५ वीज रोहित्र नव्याने कार्यान्वीत केले, कोपरगांव औद्योगिक वसाहत उद्योजकासाठी नव्याने ५ एमव्हीए क्षमतेचे नविन वीज रोहित्र बसविले,यासह ग्रामीण भागातील अन्य ठिकाणी ऊर्जा उपकेंद्र मंजूर करून त्याच्या परिपूर्तीसाठी पाठपुरावा केला तसेच ग्रामीण व वाड्या-वस्त्या वरील वीज वितरणात असलेले दोष कसे दुरुस्त करता येतील यासाठी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता नाशिक यांच्या स्तरावर बैठका घेऊन तत्कालीन ऊर्जामंत्री यांच्या मार्फत त्याचे नियोजन केले,५ वर्षात मतदार संघात वीज वितरण सुरळीत झाले,याची जंत्री त्यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घ्यावी मगच बेछुट आरोप करावेत.
आता मात्र आमदार आशुतोष काळे यांना साधा दहेगाव बोलक्याचा वीजप्रश्न सोडविता आला नाही,ते काय कोपरगांव मतदारसंघाच्या वीज आराखडा तयार करून शेतक-यांच्या शेतीला पाणी देणार?
गेल्या पाच वर्षाच्या काळात वीजेची कुठलीही समस्या शेतकयांना उद्भवली नाही, त्यांच्या शेतीला व पिकांना वेळेत पाणी मिळाले पण चालू रब्बी हंगामात शेतकऱ्याच्या शेतीला विहीरीत पाणी असूनही ते पिकांना देता आले नाही त्यामुळे शेतकयांचे कोटयावधी रुपयांचे पीक नुकसान झाले पूर्वभागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या पंचनाम्यासाठी तहसीलदार व जिल्हाधिका यांस्यांकडे मागणी केली आहे तर युवानेते विवेक कोल्हे यांनी वीजप्रश्नी मर्मावर बोट ठेवले असताना त्याच्या मिरच्या विरोधकांना का झोबाव्या,तालुक्याच्या लोक प्रतिनिधींनी वीजप्रश्न तात्काळ सोडवावा त्यांना हा माझ्या विचाराचा अन तो दुसऱ्या विचाराचा असा भेदभाव करता येणार नाही.ऊर्जा खात्याचे सध्याचे मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडून स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर करून ठेवलेल्या वीज आराखड्याच्या कामासाठी अडीच वर्षात एक रुपया देखील विरोधकांना आणता आला नाही, त्याचे खापर आमच्या नेत्याच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा सध्या कोपरगाव तालुक्यात वीज प्रश्र्नी झालेल्या खेळ खंडोबाचे आत्मचिंतन करून जनमनाचा व शेतकऱ्यांचा काय आक्रोश आहे हे त्यांच्या नेत्यांच्या कानावर घातले तरी बरे होईल, लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी न टाळता वीज प्रश्नांत तोडगा काढून शेतकऱ्यांना अखंडित वीज द्यावी,अतिरिक्त भारनियमन बंद करावे असे ते म्हणाले.