Homeकोपरगावसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांच्या निवडीचा आनंद - नितीन डोंगरे

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांच्या निवडीचा आनंद – नितीन डोंगरे

कोपरगाव – सातारा येथे होणा-या ९९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल कोपरगाव महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. हिरालाल महानुभाव यांच्यासह सर्वानी आनंद व्यक्त केला.

यावेळी जेष्ठ कवयित्री सौ. ऐश्वर्यलक्षमी सातभाई आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, विश्वास पाटील यांची निवड सर्व साहित्यिकांच्या मनात नावाप्रमाणेच विश्वास व आनंद निर्माण करणारी आहे. साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी सांगितले की, विश्वास पाटील यांची भेट झाली तेंव्हाच आमच्या मनात विश्वास निर्माण झाला होता की, यांच्या निवडीला संधी मिळाली पाहिजे.

सनदी लेखापाल नितीन डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विश्वास पाटील या नावाला साहित्य विश्वात एक वेगळेच स्थान आहे, वलय आहे त्यांच्या निवडीबद्दल कोपरगाव साहित्यिक परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!