
कोपरगांव :- देश विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करून येथील साखर उद्योगासमोर निर्माण झालेली आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी व्हिजनरी मॅन म्हणून काम केले त्यांचाच आदर्श घेवुन युवानेते विवेक कोल्हे यांनी अलिकडेच देशाचे पहिले सहकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर साखर उद्योगाबाबत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे सादरीकरण केल्याचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त देशातील सहकार चळवळ अधिक सदृढ करण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलली असुन त्याचाच एक भाग म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेल्या प्रत्येक संकटाला तोंड देत नाविन्य, आधुनिकीकरणाची कास धरत मार्गाक्रमण केले, सहकारावर खाजगीचे अनेक घाव पडले तरीही सहकार न सोडता त्यातुन शेतक-यांना चोहुबाजुने उभे करण्याचे काम संजीवनीने केले त्याच्या ६५ वर्षाच्या प्रगत कारकिर्दीची इंतभूत माहिती युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी थेट नविदिल्ली येथे सादर करून सहकारासमोर निर्माण होणारी आव्हाने यांची माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना दिली असे सांगुन ते म्हणाले की, या सादरीकरणांदरम्यान केंद्र शासनातील मंत्री, विविध खात्याचे सचिव, नाबार्ड, राष्ट्रीय सहकारी संघ, यांच्याबरोबरच सहकारक्षेत्राशी सलग्न पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अलिकडेच देशातील पहिला बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्माती प्रकल्प उभारला असुन काळाच्या कितीतरी अगोदर आज ज्या प्रकल्पांची चर्चा होत आहे ते सर्व संजीवनीने पायलट प्रकल्प म्हणून साकारून यशस्वी करून दाखविले हा शेतकरी सभासदांच्या साथीने सहकाराचा ख-या अर्थाने विजय आहे. ग्रामिण अर्थकारण मजबूत करून शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविणे हे स्वप्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिले होते ते साकारण्याचे प्रत्येक उद्दिष्ट संजीवनीने पूर्ण केले आहे. दुस-या टप्प्यातील चर्चेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी पुन्हा युवानेते विवेक कोल्हे यांना बोलावले असल्याचे ते शेवटी म्हणाले.