
संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील पश्चिम भागातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मनेगांव सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार विजयी झाले असुन यात काळे गटाचा दारूण पराभव झाला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आर.एस.जोशी यांनी काम पाहिले तर सहायक म्हणून सचिव कुणाल देशमुख यांनी सहकार्य केले.विजयी उमेदवारांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आदिंनी अभिनंदन केले आहे.
विजयी उमेदवारात कोल्हे गटाचे सर्वश्री.भिकाजी झिंजुर्डे, भगिरथ झिंजुर्डे,जालिंदर कांडेकर,गोरक्षनाथ खालकर, दिगंबर कांडेकर,राजाराम कांडेकर,सुमन कांडेकर,शोभा ढवळे,दिलीप आढाव,मिना कोल्हे,वंदना कापकर,गणेश कांडेकर,सोमनाथ गोरे यांचा समावेश आहे.या विजयासाठी सर्वश्री सिताराम कांडेकर,सुनिल कांडेकर,राजेंद्र गोरे,गणेश वाबळे,सचिन खालकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सोसायटी संचालकांनी गुलालाची मुक्त उधळण करत विजय साजरा केला.