
संपादक -राजेंद्र तासकर
सविस्तर वृत्त
काही महसूल कर्मचारी म्हणजे ब्रम्ह देवाप्रमाणे कोणाचेही नशीब बदलतात,या जुन्या म्हणीचा पुनःश्च अनूभव यावा असा अत्यंत गंभीर प्रकार कोपरगाव तालुक्यातील तहसिल कार्यालयात घडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावं येथील ग.नं.१८५/३ ही५एकर जमीन हरीश्चद्र गणेश देव आणि भालचंद्र गणेश देव या दोघा सख्खा भावांना त्यांचे आजोबा महादेव गोपाळ देव हे १९६४ साली मयत झाल्यानंतर वारसाहक्काने समसमान मिळालेली आहे.त्याप्रमाणे महसुल फेरफार ची दोघा भावांची रीतसर नं.१ ची मालकी हक्काची नोंद सदर जमीनीचा ७/१२ उताऱ्यावर सातत्याने २०१८ पर्यत होती.
हरिश्चंद्र नोकरी निमित्ताने पुण्यात अनेक वर्षांपासून राहत असल्याने आणि आता ९३ वर्षांचा वृध्द असल्याने ब्राह्मणगावला येत नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा पुतण्या माधव भालचंद्र देव याने वडील भालचंद्र देव यांचेही ८९ वर्ष वयाचा व अगतिकतेचा गैरफायदा घेऊन भालचंद्रच्या नावे खोट्या सह्या अंगठे करून हरिश्चंद्र ५० वर्षांपासून परागंदा आहे.तो अविवाहित होता म्हणून त्याचे७/१२वरील नावाची पोकळीस्त नाव म्हणून नोंद कमी करण्याचा अर्ज दिला.तत्कालिन तहसिलदार,सर्कल,तलाठी,यांनी त्याप्रकरणी अर्जाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही.नोटीसाही काढल्या नाहीत. हरिश्चंद्र च्या१९६४ पासून वारसा मालकी हक्काच्या नोंदी असतांना अर्जातील मजकूराची खात्री न करता,बेकायदेशीर रितीने हरिश्चंद्र चे नाव पोकळीस्त आहे असा आदेश काढून कमी केले.
अशारितीने भालचंद्र चे एकट्याचे नावं ७/१२ ला राहिल्यानंतर भालचंद्र चे ८९वर्षी त्याची व्याधीग्रस्त गलितगात्र असलेचा गैरफायदा घेऊन,नाटेगांव ता.कोपरगांव येथिल संदीप शिवाजी राजूडे आणि समाधान मोरे यांचे बरोबर जमिन खरेदीसाठी संगनमत करून त्यांना २”एकर जमिन लाखों रुपयांला विकून राहीलेली ३ एकर शेत वडिलोपार्जित जमीन स्व:ताचे नावे भालचंद्र कडून बक्षीस पत्राने करून घेवून चुलता हरिश्चंद्र आणि स्वतःची सख्खी बहिण नुतन यांचा वडिलोपार्जित जमीनीतील हक्क आणि हिस्सार अपहार करून हडप,गडप गिळंकृत केला.सदरचे विक्री आणि बक्षीसपत्राचे तिन्ही व्यवहार देखिल भालचंद्रला गलितगात्र अवस्थेत उभे करून एकाच दिवशी एकमेकांचे व्यवहारास साक्षीदार दाखवून संशयास्पद परिस्थितीत नोंदविलेले आहे.
हरिश्चंद्र ने याबाबत तत्कालीन कलेक्टर साहेब अहमदनगर, प्रात साहेब शिर्डी, इत्यादी वरीष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली.कलेक्टर अहमदनगर यांनी देखील तत्परतेने सन २०२०मध्ये या गंभीर गुन्हेगारी व बेकायदेशीर कारवाई ची चौकशी करून ताबडतोब अहवाल देण्याबाबत तहसिलदार कोपरगाव यांना लेखी हुकूम केले आहे परंतु यात महसूली कर्मचाऱ्यां विरूद्ध आरोप असल्याने आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून नाईलाजाने हरिश्चंद्र ने मी परागंदा नाही,अविवाहित पण नाही,तसेच मला पत्नी व दोन मुली असुन आम्ही पुणे येथे राहातो त्यामुळे ज्या अर्जात मला परागंदा अविवाहित असे दाखवून माझ्या मालकी हक्काच्या जमिनी वरील नाव पोकळीस्त असे बेकायदेशीरपणे कमी केलेले माझे नाव पुनःश्च पुर्ववत गट नं.१८५/३वर मालक म्हणून नोंदवून जमिन प्रत्यक्ष ताब्यात देवून त्या जमीनीचा संगनमताने अपहार करणाऱ्यांविरूध्द सक्त कायदेशीर कारवाई करणेसाठी हरिश्चंद्र देव वय-९३ वर्षे व पत्नी सौ पदमजा हरिश्चंद्र देव वय -८३ हे वृद्ध दांपत्य आता तहसिलदार कोपरगाव,प्रांत शिर्डी,जिल्हा अधिकारी अहमदनगर,यांना समक्ष भेटणार आहे त्यांना त्यांचे हयातीत न्याय मिळावा व जमिन परत मिळावी एवढी तरी माफक अपेक्षा महसूल खात्याकडून पुर्ण व्हावी अशी त्यांची व सर्व सामान्य जनतेची सुद्धा महसूल खात्याकडून अपेक्षा आहे. त्यासाठी कडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले विद्यामान जिल्हाधिकारी डॉ.मा.श्री.भोसले साहेब अहमदनगर ताबडतोब दखल घेतील एवढीच अपेक्षा अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दिली.