Homeकोपरगावआजचा दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीच्या गौरवाचा आणि प्रेरणेच्या तेजाचा साक्षीदार ठरला- गोरे...

आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीच्या गौरवाचा आणि प्रेरणेच्या तेजाचा साक्षीदार ठरला- गोरे सर

कोपरगाव : – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पवित्र निमित्ताने मुंबई नगरीत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सौ. सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या मानाच्या सन्मानासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव च्या ” सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान” यांची निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संगीता अरविंद मालकर यांनी हा सन्मान अत्यंत अभिमानाने आणि नम्रतेने स्वीकारला. ही केवळ एका संस्थेची गौरवगाथा नाही, तर समाजातील असंख्य महिलांच्या स्वप्नांना उजाळा देणाऱ्या कार्याची दखल आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा दीप हाती घेऊन महिलांच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि स्वाभिमानासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या प्रयत्नांना मिळालेली ही मानाची पावती आहे.

खरंच… जेव्हा समाजात कुणी स्त्रीशक्तीचा दिवा प्रज्वलित करते,
तेव्हा त्या प्रकाशात अनेक आयुष्यांचे मार्ग उजळून निघतात. अहिल्यानगरच्या मातीतील ही कर्तृत्ववान कन्या सौ. संगीता मालकर आणि त्यांच्या संस्थेने मिळवलेला हा सन्मान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अभिमान… कौतुक… आणि प्रेरणेचा उज्ज्वल क्षण!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!