Homeकोपरगावपोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा- डॉ. अशोक गावित्रे

पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा- डॉ. अशोक गावित्रे

कोपरगाव : – महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करिता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने 19 जुलै 2024 रोजी काढला आहे. परंतु, आज देखील अनेक पोलीस स्टेशनमध्ये हा कक्ष स्थापन झालेला नसून तो लवकरात लवकर स्थापन करून कार्यरत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर अशोक गावित्रे यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री अमोल भारती तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व कोपरगाव शहराचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच यामध्ये पत्रकार, महिला व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांचा सदस्य म्हणून समावेश करून त्यांच्या नियमित आढावा बैठक व्हाव्यात यामुळे परिसरातील चालणारे अघोरी प्रकार समोर येऊन त्यांना वेळीच आळा घालता येईल ज्योतिषी बाबा, बुवा आणि राजकारणी, सरकारी अधिकारी धनदांडग्या प्रभावशाली व्यक्ती यांची साठ गाठ किती भयानक शोषणकारी असते याचे हादरवून टाकणारे चित्र भोंदू बाबा ज्योतिषी अशोक खरात या प्रकरणातून महाराष्ट्राच्या समोर आले असून अशा जादूटोणा बुवाबाजीला वेळीच पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून कार्यरत करा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!