
संपादक – राजेंद्र तासकर
एकीकडे हजार कोटींच्या घोषणांचा सुकाळ आहे तर दुसरीकडे या मतदार संघातील शेतक-याला जगणं मुश्कील झालं आहे त्याचं नादुरूस्त रोहित्र महिनो महिने दुरुस्त होत नाही, त्याची शेती वीजेअभावी देशोधडीला लागली आहे,पाणी असूनही तो ते पिकांना देवु शकत नाही परिणामी त्याच्या पिकांची राखरांगोळी झाली त्या नुकसानीचे पंचनामे होवुन मदत मिळालीच पाहिजे, जनसामान्यांच्या छोटया छोटया प्रश्नांसाठी आक्रोश आहे,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांचा आवाज दाबुन या मतदार संघाबाबत वेगळे चित्र रंगवत आहे,मात्र माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आम्हांला संघर्षाची शिकवण देवुन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून न्यायाचा मार्ग दाखविला आहे तेंव्हा आमची लढाई ही आमदाराविरूध्द नाही तर प्रवृत्तीविरूध्द आहे याच्या पेक्षाही पाच पट हजारोंच्या संख्येने शेतकरी

नागरीक घेवुन थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत धडकु पण शेतक-यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवुच असा ठाम विश्वास कोपरगांवऔद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.तरूणाईच्या हाताला काम मिळावे म्हणून आम्ही कोपरगांव येथे एम आय डी सी ची मागणी केली आहे त्यात कुणीही खोडा घालु नये असा इशाराही कोल्हे यांनी यावेळी दिला.
कोपरगांव मतदार संघातील शेतकरी व जनसामान्यांचे प्रश्न गेल्या अडीच वर्षापासुन टांगणीला पडले आहेत,वीजेसह पाटपाण्याचा खेळखंडोबा झाला आहे,बारमाही गोदावरी कालव्या बरोबरच निळवंडे धरण कालव्यांची कामे मार्गी लागावी, शहरवासियांसाठी निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजना मार्गी लागावी,विस्थापीत टपरीधारकांचे

तात्काळ पुर्नवसन व्हावे,गोर गरीब निराधार गरजुंना रेशनकार्ड,घरकुल,संजयगांधी निराधार,श्रावण बाळ वृध्दापकाळ यासह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे त्यांच्या मागण्यांचा जनआक्रोश तसेच बससेवा पुर्ववत सुरू करावी,एम आय डी सी साठी जागा संपादित करून ती तात्काळ सुरू करावी यासह असंख्य प्रलंबित मागण्यांचा आवाज महाविकास आघाडी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व तत्कालीन आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कचेरी कोपरगांव येथे जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन सोमवारी करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी श्री.साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून आघाडी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय,शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे, नही चलेगी,नही चलेगी तानाशाही नही चलेगी,कोपरगांव तालुक्याला अंधाराच्या खाईत लोटणा-यांचा धिक्कार असो, कंदीले घेवुन मोट धरू,सांगा महाविकास आघाडी सरकार आम्ही अंधारात पेरू का,कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय सोडणार नाही इत्यादी घोषणांनी परिसर दुमदुमन टाकत तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाचे सभेत रूपांतर झाले.नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी,नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे,वीज वितरण कंपनीचे श्री.खराटे आदिंना शेतकरी,जनसामान्य नागरिक,पालक,सुशिक्षीत बेरोजगार विस्थापीत टपरीधारक, निळवंडे लाभधारक शेतक-यांसह हजारोंच्या स्वाक्षरीचे निवेदने यावेळी देण्यांत आले.याप्रसंगी सर्वश्री.बाळासाहेब वक्ते,जितेंद्र रणशुर,एल.डी पानगव्हाणे, केशव भवर,विक्रम पाचोरे, मच्छिंद्र टेके आदिंनी वीज पाटपाणी,रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा,एम आयडीसी,बससेवा,ड यादी घरकुले,गोदावरी कालवे, निळवंडे कालवे,विस्थापीत टपरीधारक, धोंडेवाडी विस्थापीत,कोरोना रूग्ण आपत्ती निधी,शेतक-यासह जनसामान्यांच्या प्रलंबित समस्यांचा पाढा वाचला.
सौ.स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, शेतक-यांचा गळा दाबण्यांचे काम हे महाविकास आघाडी शासन करत असुन,फसवा फसवीचा खेळ सुरू आहे.कोपरगांव मतदार संघाच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री एक हजार कोटीच्या घोषणा करतात,या शासनाची तिजोरी पैशांनी फुल्ल भरलेली आहे मात्र दुसरीकडे आमचा शेतकरी उपाशी आहे.आमच्या छोटया छोटया समस्या सोडविण्यासाठी या सरकारला वेळ नाही,काकडी ग्रामपंचायतीचा साडेपाच कोटीचा थकीत महसुल द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत मात्र एक हजार कोटी आहेत हे अभासी चित्र येथील मतदारांच्या मनांवर बिंबविण्याचा प्रकार आहे तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपल्या कार्यकाळांत बसस्थानक,पोलिस ठाणे, अग्निशमन केंद्र,पंचायत समिती कार्यालय,नगरपालिका इमारत, वाचनालय,गोकुळनगरीचा पुल इत्यादी विकास कामे पूर्ण झाली त्याची उदघाटने महाविकास आघाडी शासनाचे मंत्री करतात, तीन नापास विद्यार्थी राज्याच्या सत्तेत बसले आहेत.शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यावर बोलायला या सरकारमधील मंत्री महोदयांना वेळ नाही,गृहमंत्री जेल मध्ये आहे आणखी काही त्या रांगेत आहेत. गोदावरी कालव्यावर बिगर सिंचन पाण्यांचा भार वाढतो आहे, निळवंडे शिर्डी पाणी योजनेतुन कोपरगांव शहराला येणारं पाणी बुध्दीभेद करून थांबविलं पण यात नुकसान सर्वसामान्यांचे झालं.या पाण्यांतुन गोदावरी कालव्यांना एक जादा पाण्यांचे आर्वतन शेतक-यांना मिळणार होते,माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यासह मतदारांच्या भल्यासाठी सातत्याने स्वत:च्या शासनाविरूध्द येवुन संघर्ष केला,ते कधीही खचले नाही तर लढत राहिले तोच वसा आम्ही घेतला आहे,आज राजकारणांत नैतिकतेचे अध:पतन चालु आहे असे सांगुन त्यांनी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला आणि हे प्रश्न तात्काळ सुटावे म्हणून मागणी केली.
श्री.विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की,येथील प्रशासन कुणाच्या तरी दडपणाखाली काम करताना दिसत आहे पण आम्ही कोल्हेंच्या संघर्ष मुशीतुन घडलेलो फायटर आहोत,प्रश्न सुटल्या शिवाय गप्प बसणार नाही.नेमका आमच्याच जनआक्रोश आंदोलनाला अहमदनगर जिल्हयातच प्रतिबंधात्मक आदेश का लावला गेला,गेल्या अडीच वर्षापासुन या मतदार संघातील वंचित शेतकरी जनसामान्य अभासी चित्रातुन बाहेर येवुन स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरून आम्हाला साथ देत आहे.लोक प्रतिनिधी म्हणाले आगे आगे देखो होता है क्या,झाले काहीच नाही तर शहरातील विस्थापीत टपरीधारक मात्र उठविले, विकासाचे कुठलेच काम झाले नाही.स्व.शंकरराव कोल्हेंच्या शिकवणूकीतुन गेली सात दशके तयार झालेली आमची संघटना आहे चुकीचा इतिहास आम्ही जनतेपुढे कधीच मांडत नाही, निळवंडे शिर्डी कोपरगांव पाणी योजनेला खोडा घालुन आमदारांनी गोदावरी कालव्यांचे एक जादा पाण्यांचे आवर्तनाचे वाटोळे केले त्याचा आम्ही निषेध करतो,संगमनेर अकोले शहराने पाणी उचलले त्यावेळी कुणीही विरोध दाखविला नाही नेमक कोपरगांवला पाणी येणार म्हटलं की,आडमार्गाने त्याला खोडा घालण्याचे पाप काही महाभागांनी केले.शेतक-यांना वंचित ठेवुन शहरवासिय पाणी घेणार नाहीत त्यांनाही त्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे याच विचाराचे आम्ही आहोत असेही त्या म्हणाल्या.यावेळी वीज वितरण कार्यालयाच्या अधिका-यांना वीजेच्या खेळखंडोब्याचा निषेध म्हणून कंदील भेट देण्यांत आला. सुत्रसंचलन दिपक चौधरी यांनी करून आभार मानले.या जनआक्रोश आंदोलनात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ८९ गावातील शेतकरी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी,सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे आजी-माजी संचालक,युवा कार्यकर्ते, विस्थापित,आजी माजी नगरसेवक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत आमचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देवु असे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे म्हणाले.