
संपादक - राजेंद्र तासकर
येथील महावितरण 33/11 kv औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्राचे प्रधान यंत्रचालक संजय नामदेव दिक्षीत यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार देवून नुकतेच नाशिक येथील मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल-श्रीफळ प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नाशिक परिमंडळाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच ग्राहकांच्या हितासाठी व कंपनीच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्या हस्ते हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.हा पुरस्कार विभागातून एका कर्मचाऱ्यांस देण्यात येतो.
सन 2021 ते 2022 या वर्षाचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नाशिक येथे पार पडला.
या कार्यक्रमात मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते संजय दिक्षीत यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.गेल्या तीस वर्षापासून ते कंपनीत गुणवंत कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कारने गौरविण्यात आहे.आदर्श कामगार दिक्षीत यांना मिळालेल्या गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार हिच खरी त्यांच्या कामाची पावती असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.