
कोपरगाव : – श्रद्धा ठेवून साधना केली की यश मिळते, आत्मिक समाधानाचे संतपीठ आत्मा मालिक असून ओम गुरुदेव माऊलींच्या वाणीची प्रचिती माझ्यासह सर्वांना आलेली असून संतवाणी श्रवण करणे हा समाजसेवेचा मोठा आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी केले.

आत्मा मालिक ध्यानपीठ श्रीक्षेत्र कोकमठाण व संवत्सर पंचायत समिती गणातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्यावतीने नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परमानंद महाराज होते.
प्रारंभी तालुका बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी प्रास्ताविकात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेल्या विकास कार्याची माहिती देऊन युवा नेते विवेक कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्याकडून सेवा हाच धर्म वसा घेत आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली आहे. साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद थोरात म्हणाले की, दक्षिण काशी गंगा गोदावरी काठावर अनेक संत महात्म्यांनी केलेल्या तपश्चर्येतून श्रीक्षेत्र कोकमठाण जगाच्या नकाशावर आले आहे. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला राज्याच्या सत्ताकारणात स्थान देत कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे. कोकमठाणसह विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाच्या पिण्याच्या पाणी योजना शासनाच्या माध्यमांतुन मार्गी लावण्यांत कोल्हे कुटूंबियांनी मोठा हातभार लावला आहे,. वेळप्रसंगी संंजीवनी उद्योग समूहाचे माध्यमातूून सहकार्य केले आहे. नव्यांने निर्माण झालेल्या नागपुर मुंबई समृध्दी महामार्गामुळे येथील शेतकऱ्यांचे कोकमठाण वासियांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. सोनेवाडी शिवारातुन थेट कोकमठाणपर्यंत पावसाचे पाणी वाहुन येते त्यातुन शेतीचे नुकसान होवुन आसपासच्या रहिवासीयांनाही त्रास होतो, तेंव्हा ड्रेनेज व्यवस्थेचे काम युवानेते विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेवुन मार्गी लावावे, या परिसरातील आंतरराष्ट्रीय देवस्थानामुळे कमी पडणाऱ्या जन सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांनी दहा वर्षाचा मास्टर प्लॅन तयार करून २०२७ कुंभमेळासह सर्व कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमहोदयांकडून आर्थिक निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावावी असे ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलतांना परमानंद महाराज म्हणाले की, संस्कार संस्कृतीला ताकद देण्यांचे काम धर्मसत्ता तर समाजकारणाच्या माध्यमांतुन लोकसेवेचे काम करण्यांत राजसत्ता मदत करत असते. विश्वात्मक जंगली महाराजांच्या पदस्पर्शाने या परिसरात निराकार परमात्म्याचे व्यासपिठ उभे करत त्याची महती सर्वदुर पोहोचविली आहे. १९८६ ते २०२२ पर्यंत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जंगली महाराज आश्रमाच्या प्रत्येक समस्येला आपलेसे मानून त्याची सोडवणुक केली. त्यानंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि आता तिसरी पिढी युवानेते विवेक कोल्हे समाजसेवेचे अखंड व्रत घेत कार्यरत असुन सहकार शिक्षणातुन ते या परिसराच्या वैभवात भर घालतील आणि विधीमंडळ कामकाजाची शिकवण त्यांना थेट संसद मंडळापर्यंत घेवुन जाईल. कोकमठाण ही भूमि सत्पुरूषांची असुन अमृताला मुक्ती देणा-या मातीचा सुगंध येथे सदैव दरवळतो आहे, आगामी कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी कोकमठाण येथे पवित्र घाट बांधण्याचे काम करून जंगली महाराज आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, ब्रम्हलिन संत रामदासी महाराज, संवत्सर शृंगेश्वर, चक्रधर स्वामी मंदिर, कोकमठाण विभांडक ऋषी, देवयानी देवी, जुनीगंगा देवी, राघोबा दादा वाडा, धामोरी अडबंगीनाथ, गुरू शुक्राचार्य-कचेश्वर कोपरगांव बेट, साईबाबा तपोभूमी, धोंडीबा नगर साईधाम आदी अध्यात्मीक महत्व महामार्गावर फलकाच्या माध्यमांतुन अधोरेखीत करावे अशी मागणी परमानंद महाराज यांनी शेवटी केली.
आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, विश्वात्मक जंगलीदास माउली आणि संवत्सर गणाच्यावतीने झालेला सत्कार जबाबदारीची जाणिव करून देणारा असून विधान परिषदेच्या मिळालेल्या पदाच्या माध्यमांतुन कोपरगांव मतदारसंघासह राज्यातील महत्वाच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू., गल्लीपासुन थेट दिल्लीपर्यंत संवाद साधण्याची उर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी दिली असुन त्याबरोबरच अध्यात्मीक उर्जेचे अलौकीक स्थान कोकमठाण पंचक्रोशीतुन मिळते या अनुभवाची प्रचिती आपल्याला आली आहे. कर्मातुन प्रत्येकाची ओळख निर्माण होत असते, मेव्यापेक्षा सेवेला आपण महत्व देतो त्यातुन लोकसंग्रह वाढत जातो, माणुस कामाचा मित्र हक्काचा या भावनेतुन जनतेने आपल्याला अडी अडचणी सांगाव्या त्याची निश्चित सोडवणुक करू. नाशिक अहिल्यानगर सह मराठवाडयाच्या पाणीप्रश्नाची सोडवणुक करण्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचे काम मराठवाडा वॉटरग्रीडच्या माध्यमांतुन हाती घेतले असुन स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्वप्नांची पुर्ती यातुन होत आहे. आगामी काळात १९२ टीएमसी पाणी यातुन उपलब्ध होवुन पुर्वीसारखी समृध्दी कोपरगांव मतदारसंघात निर्माण करण्यांत जीवाचे रान करू, त्यात कुठेही कमी पडणार नाही, जनतेचे प्रश्न येथुन पुढच्या प्रत्येक अधिवेशनात मांडुन त्याला न्याय मिळवुन देवु, मिळालेले पद हे जनता जनार्दनांचे आहे ही जनभावना सतत आपल्या मनांवर कोरली गेली आहे असेही ते शेवटी म्हणाले. पांडुरंग शास्त्री शिंदे यांंचेही भाषण झाले
याप्रसंगी विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, विजयानंद महाराज, विवेकानंद महाराज, ब्रम्हानंद महाराज, हनुमंत भोंगळे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक बापूसाहेब बारहाते, शिवाजीराव वक्ते, शिवाजीराव बारहाते, बाळासाहेब वक्ते, त्रंबकराव परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, राजेंद्र भाकरे, बाळासाहेब शेटे, रामभाउ कासार, राजेंद्र परजणे, गोविंद परजणे, महेश परजणे, विजय रोहोम, मुकुंद काळे, पंडीत भारूड, गणेश साबळे, वसंतराव गायकवाड, सुभाष थोरात, हरिभाउ लोहकणे, साहेबराव गाडे, सुभाष मोगरे, उत्तमराव चव्हाण, आण्णासाहेब लोहकणे, वसंतराव लोंढे, सोपानराव रक्ताटे, रघुनाथ गायकवाड, संदिप चाळक, पोपटराव पवार, जालींदर निखाडे, नंदकिशोर पवार, नंदकुमार रक्ताटे, रामभाउ रक्ताटे, गोरख चव्हाण, रमेश क्षीरसागर, अजित कोताडे, नारायण लोहकणे, मुरलीधर वाकचौरे, बाळासाहेब कोताडे, सोमनाथ वाळुंज, गोकुळ शिंदे, शेखर रक्ताटे, भाउसाहेब कोताडे, दिगंबर लोहकणे, भानुदास लोहकणे, चिमा दैने यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, संवत्सर, कोकमठाण, सडे पंचक्रोशीतील सर्व सहकारी मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.