
कोपरगाव :- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकूलचे राज्यात सर्वाधिक एकशे सात विद्यार्थी गुणवत्ता यादित आले. त्यात पाचवीच्या दहा व आठवीच्या सत्यान्नव विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे सोळा लाख पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. सलग तेराव्या वर्षी झालेल्या या विक्रमी कामगीरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व विश्वस्त मंडळाने या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन केले.
याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि राज्य शिक्षण विभागाच्या वतीने हि परीक्षा घेतली जाते. आजवर या गुरूकुलाच्या ७९५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यातील सोळा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले. आत्मा मालिक पॅटर्न चे हे यश आहे. विशेष तयारी वर्ग, सुपर नाईट अभ्यासिका, सुवर्ण पहाट अभ्यासिका, स्मार्ट सण्डे उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दिर्घ सुट्यांमध्ये विशेष तयारी शिबिरे, सराव परीक्षांची नियोजनबद्ध आखणी यामुळे आम्ही सातत्याने हे यश मिळवीत आहोत.
विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विषय शिक्षकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले