Homeकोपरगावस्कुल बसचे चालक आणि वाहक हे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दृष्टीने देवदूत - असिस्टंट...

स्कुल बसचे चालक आणि वाहक हे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दृष्टीने देवदूत – असिस्टंट इन्स्पेक्टर राकेश जगताप

कोपरगाव :- स्कुल बसचे चालक आणि वाहक हे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दृष्टीने देवदूत असतात. त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन रोजचा बस प्रवास करावा. त्यासाठी बसचा वेग नियंत्रीत ठेवावा आणि वाहकांनी प्रवासाच्या कालावधित प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवावे. अशा सुचना श्रीरामपूर येथील परिवहन कार्यालयातील असिस्टंट इन्स्पेक्टर राकेश जगताप यांनी केल्या.

त्यांनी आज आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलातील आत्मा मालीक इंग्लिश मीडियम स्कूलला भेट दिली. शालेय स्तरावरील परिवहन समिती सहविचार सभेच्या इतिवृत्ताचे अवलोकन केले.

त्यानंतर त्यांनी स्कुल बस च्या वाहन चालक आणि वाहकां सोबत चर्चा करून त्यांना सुचना दिल्या.प्राचार्य नितीन सोनवणे आणि वाहन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक विश्वास बारवकर, तसेच वीस वहान चालक व दहा वाहक उपस्थित होते.
जगताप म्हणाले, विद्यार्थी हे शाळा आणि पालकांसाठी अनमोल आहेत. सर्व विद्यार्थी बसल्याशिवाय बस सुरू करू नये. विद्यार्थी घरी सोडते वेळी विद्यार्थी पूर्णपणे बसच्या खाली उतरला आहे याची खात्री करावी. त्यांना पालकांच्या स्वाधिन केल्या शिवाय पुढे जाऊ नये. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवू नये. बस सुरू विद्यार्थी उभे रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी. चालक व वाहकांनी गणवेश परिधान करावा. ओळख पत्र व वाहन परवाना सोबत ठेवावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!