
उपाध्यक्ष वाघडकर, कार्याध्यक्ष कोपरे तर संघटक लाड
कोपरगाव – जीवाचे रान करतं अन्ययाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार बांधव नेहमीच अहोरात्र करत असतात, सुरक्षेच्या दृष्टीने संघटीत राहणे तितकेच गरजेचे आहे. त्याच दृष्टीने नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असणारी व देशभरात सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारणी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराध्यक्ष हफिज शेख यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
बुधवार दि ८ जुलै रोजी संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, तालुका सचिव प्रा विजय कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या कोपरगाव शहर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये शहर उपाध्यक्ष पदी रवी वाघडकर, कार्याध्यक्ष पदी स्वप्नील कोपरे तर शहर संघटक पदी जेष्ठ पत्रकार संजय लाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या सर्व नूतन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर या प्रसंगी शहर नूतन पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटना वाढीसाठी प्रयत्न करत राहील. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे. त्यासोबतच वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवत संघटनेचा नावलौकिक वाढविण्यास योगदान देणार असल्याचे सांगितले.