
कोपरगाव :- कोपरगावचे प्रसिध्द व्यापारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तम मार्गदर्शक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत असलेले कै. चंद्रकांत नानुराम ठोळे यांचे वयाच्या ८५ वर्षी दुखःद निधन झाले.
कै. ठोळे यांच्या निधनाने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय परिवाराची सर्वात मोठी हानी झाली आहे. स्वभावाने ते खुप मनमिळाऊ होते. त्यांचे मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार आणि संस्थेच्या प्रगतीसाठी केलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने व्यापारी वर्गात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी, जावई असा मोठा परीवार आहे.