Homeकोपरगावमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व साई देवा प्रतिष्ठानच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ; एसटी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व साई देवा प्रतिष्ठानच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ; एसटी स्मार्ट कार्ड शिबिरात शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व साई देवा प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

कोपरगाव : नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा कोपरगाव आणि साई देवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एनसीएमसी एसटी स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.२ सप्टेंबर) बाबा चौक, कोपरगाव येथे करण्यात आले. या शिबिराचा शहरातील १०० हून अधिक महिला -पुरुष नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचा प्रारंभ पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप व साई देवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा दिपक वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक आकाश वाजे यांच्या हस्ते व संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी तालुका उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे, कार्याध्यक्ष किसन पवार, सचिव विनोद जवरे, शहर अध्यक्ष हाफिज शेख, उपाध्यक्ष रवी वाघडकर, कार्याध्यक्ष स्वप्निल कोपरे, संघटक सोमनाथ डफळ व संजय लाड, खजिनदार अमोल गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख विशाल लोंढे, सल्लागार काका खर्डे व दिनेश जोशी, संपर्कप्रमुख राजेंद्र तासकर यांच्यासह फकीरराव टेके, कचरू लोहकरे, सतीश जाधव, मिलिंद विघे, प्रमोद पवार, अक्षय काळे आदी पत्रकार तसेच साई देवा प्रतिष्ठानचे शुभम पेकले, आकाश अंभोरे, साईनाथ त्रिभुवन, आभास भाई,संकेत मंडलिक, चिराग मोर, प्रशिक भातनकर , ऋषिकेश विश्वकर्मा, जय ढाकणे, प्रसाद भोसले, अतुल गुंजाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्याध्यक्ष किसन पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के तिकीट सवलत मिळते. तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळत असल्याचे सांगितले तर कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक आकाश वाजे यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करत अतिशय महत्वाचा असा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व साई देवा प्रतिष्ठान आणि स्मार्ट कार्ड सेंटर चालक सोमनाथ डफाळ यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!