
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोपरगाव संपर्क कार्यालयाचा शुभारंभ.
कोपरगाव :- महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यांमध्ये २७ हजारांहून अधिक पत्रकार सभासद असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोपरगाव संपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यालय शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे, तालुका उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे, कार्याध्यक्ष किसन पवार, शहराध्यक्ष हफिज शेख, विनोद जवरे, स्वप्नील कोपरे, फकीरराव टेके, रवी वाघडकर, सोमनाथ डफळ, संजय लाड, विशाल लोंढे, काकासाहेब खर्डे, दिनेश जोशी, राजेंद्र तासकर, मिलिंद विघे,प्रमोद पवार, सतीश जाधव, कचरू लोहकरे, गहिनीनाथ घुले, अक्षय काळे, योगेश रुईकर, रहीमखा पठाण, राहुल कोळगे, मधुकर वक्ते, महेश गायकवाड, शहाबाज कुरेशी, गोविंद वाकचौरे, सुमित थोरात, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.विश्वासराव आरोटे म्हणाले कि, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून व्यवस्था बदलण्याची क्षमता पत्रकारांमध्ये आहे. पारंपरिक पत्रकारितेसोबत सोशल मीडियाच्या आधुनिक युगातील तंत्रज्ञान आत्मसात करून पत्रकारांनी कार्य करावे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी विविध उपक्रम राबवावेत.” कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेले संपर्क कार्यालय पत्रकारांच्या संपर्कवाढीसाठी तसेच सामान्य जनतेशी जोडण्याचा खुला मार्ग म्हणून उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे यांनी कोपरगाव तालुका पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटना बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. विजय कापसे यांनी करत संघटनेच्या वतीने तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली तर. सचिव विनोद जवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले स्वागत केले, तर शहराध्यक्ष हफिज शेख यांनी आभार मानले.