
जैन राष्ट्रसंत व भारत गौरव,प्रखर वक्ते पूलक सागर महाराज याच्या वाढदिवसानिमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आर्शिवाद घेतांना तसेच वाढदिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करतांना.

संपादक -राजेंद्र तासकर
जैन राष्ट्रसंत व भारत गौरव,प्रखर वक्ते पूलक सागर महाराज यांचे विचार अत्यंत प्रभावी असुन त्यातुन आपल्याला उर्जा मिळते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. भारत गौरव पुलक सागर महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांचा बुधवारी संजिवनी उद्योग समूह व कोपरगाव शहर तालुका वासीयांच्या वतीने गौरव करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.त्यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे कैलास ठोळे,कोपरगांव बार असोसिएशन व ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जोशी,मनसेचे संतोष गंगवाल,मणिकचंद ग्रुपच्या शोभा धाडीवाल,पंच अशोक पापडीवाल,रेखा काले,सत्येन मुंदडा,विजय बंब,पी.सी.ठोळे, पंच महावीर दगडे,शोभना ठोळे, मंजु काले,दिलीप अजमेरे, महावीर काले,अतुल काले, अजित लोहाडे,जितेंद्र कासलीवाल,फुलचंद पांडे, विशाल बडजाते,सुशांत घोडके, सचिन अजमेरे यांच्यासह जैन बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.
सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,कोपरगांव आणि जैन समाज एक अतुट नाते आहे. येथील महावीर मंदिरात आजवर अनेक जैन राष्ट्रसंतांनी हजेरी लावून आपल्या प्रभावी विचारांनी सर्व समाजातील घटकांना उच्च विचारांची प्रेरणा देवुन योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.आज प्रत्येकजण मानसिक स्वास्थ हरवून बसला आहे.भगवान महावीरांनी दिलेली शिकवण आणि भारतगौरव पूलक सागर महाराज महावीरांच्या विचार प्रसाराचे जे काम करीत आहेत ते विशेष कौतुकास्पद असून त्यातून जीवन कसे जगावे याची शिकवण मिळते.संत हे समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करून जीवन जगण्याच्या विचारांना बळ देत असतात,कोपरगांववासियांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभले हा अनमोल योगायोग आहे,वाढत्या तपमानाचा पारा कमी करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या,शेवटी अतुल काले यांनी आभार मानले.