
संपादक -राजेंद्र तासकर
महात्मा ज्योतिबा फुले यांना दि.11 मे 1888 ला त्यांच्या आयुष्याभर केलेल्या समाज कार्याचा गौरव म्हणून जनतेतून त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली होती या दिनाचे औचित्य साधून कोपरगाव येथे संत सावता माळी युवक संघाच्या वतीने महात्मा दिन उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती युवक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी दिली.
जगात महात्मा ही पदवी मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित करून जनतेकडून देण्यात आली ही पहिलीच घटना त्यामुळे हा अस्मरणीय ऐतिहासिक दिवस आपण महात्मा दिन म्हणून जल्लोषात साजरा करतो.त्या निमीत्त कोपरगाव माळी बोर्डींग येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या दिवसाचे महत्व जपण्यासाठी कार्यक्रम आयोजित करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भारत संचार निगमचे संचालक नवी दिल्ली रविकाका बोरावके साहेब,कोपरगाव माळी बोर्डींग अध्यक्षअनिल पांढरे, कोपरगाव महात्मा फुले मंडळ अध्यक्ष प्रदीप नवले, कोपरगाव नगरपरिषद नगरसेवक वैभव गिरमे,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे,शहरध्यक्ष शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे,संदीप डोखे,मनोज चोपडे,अनंत वाकचौरे,नंदकुमार शिवरकर, मच्छिंद्र पठाडे,साईनाथ बोरावके, गिरीश हिवाळे,रमेश बेनकर,वैभव घाटेआदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.