
कोपरगाव : – क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी व कोपरगाव तालुका क्रीडा समिती आयोजित मुलींच्या खो – खो तालुकास्तरीय स्पर्धा कोपरगाव येथील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.यामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील 14 वर्ष.. 17 वर्ष, 19 वर्ष गटात 38 संघानी आपला सहभाग नोंदविला. तर या स्पर्धेचे उद्धाटन संजीवनी महिला बचत गट अध्यक्षा संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ अध्यक्ष अरुण चंद्रे सर, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मकरंद कोऱ्हाळकर सर, सुभाष पाटणकर सर, राजेंद्र पाटणकर सर, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य मोहसीन शेख सर यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खेळाडुंना मार्गदर्शन करतांना सौ. रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या की, मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक व बौधिक विकास होऊन, शरीरात आजाराला पळविण्याची प्रतिकार शक्ती निर्माण होते. असे मैदानी खेळ प्रत्येकाने अभ्यासाबरोबर अंगीकारले पाहिजे. शालेय जीवनात खेळले तर भविष्यात किती उपयोग होतो हे पटवून दिले. तर, अरुण चंद्रे सर यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी स्व – मालकीची जमीन केवळ तालुक्यातील विद्यार्थी यांना विविध खेळ खेळण्यासाठी दिली याची आठवण करून दिली.

यावेळी कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम सर, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख सर, सुरेश सोनवणे सर, योगेश बिडवे सर, रिजवान पठाण सर, दिनकर मॅडम, आहेर सर, प्रा. सुनील कदम सर, नेंद्रे सर, गोपाळ सर, कोल्हे सर, वसावे सर, भोये सर, चांदर सर, वाघ सर सह अनेक महिला शिक्षिका उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच.. गुण लेखक नितीन निकम, विठ्ठल वसावे, भोये, लतीफ शेख, राहुल रुईकर, राहुल जाधव, अशोक गायकवाड, पार्थ भिंगारे, मनमोहन लोहोकने, ईशान वरकड यांनी काम पाहिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा मार्गदर्शक व तालुका क्रीडा समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख अनुप गिरमे सर यांनी केले.. तर उपस्थित सर्वांचे आभार अध्यक्ष नितीन निकम सर यांनी मानले.