
कोपरगाव : – कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात मौजे भोजडे येथील जागृत देवस्थान राजा वीरभद्र महाराजांची यात्रा सालाबादप्रमाणे उत्साहात संपन्न झाली असून पहिल्या दिवशी आरत्या, दुस-या दिवशी बारागाड्या आणि तिसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धा अश्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा जपत पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा भरविण्यासाठी भोजडे ग्रामपंचायत, भोजडे यात्रा कमिटी आणि समस्त भोजडे ग्रामस्थांनी मेहनत घेतली असल्याने या यात्रेला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

भोजडे गावातील या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून यातून ग्रामीण अर्थकारणाला बळकटी मिळत असल्याने संवत्सर जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल यात होताना दिसत असल्याचे मत सरपंच सुधाकर वादे आणि चेअरमन मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले. भोजडे सोसायटीचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, गेल्या ११ वर्षापासून येथील कुस्ती स्पर्धेत साखळी कुस्ती स्पर्धा घेतल्या जात असून त्यात महिला आणि पुरुष गटातील संपूर्ण राज्य आणि परराज्यातून जवळपास १०० नामांकित मल्लांनी सहभाग घेतला. त्यातून

चुरशीच्या लढती झाल्या आणि शेवटी महिला गटातून हिमाचल प्रदेश च्या बंटी शर्मा आणि येवला येथील शीतल पवार विजयी झाल्या तर पुरुष

गटातील साखळी स्पर्धेत हर्सूल चा ज्ञानेश्वर केरे भोजडे श्री चषकाचा मानकरी ठरला तर संभाजीनगरचा दिनेश जावळे भोजडे केसरी चषकचा मानकरी ठरला आहे.
परिसरातील सर्वात मोठ्या कुस्ती स्पर्धा होत असून वाढता प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी १२ वर्ष पूर्ण होत असल्याने तपपूर्ती वर्षानिमित्त साखळी स्पर्धा मॅटवर भरविणार असल्याची घोषणा चेअरमन मुकुंद शहाराम सिनगर आणि संचालक दीपक धोंडीराम धट यांनी व्यक्त केली.

यावेळी अध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी सरपंच ज्ञानेश्वर सिनगर, माजी उपसरपंच दिलीप सिनगर, संजय सिनगर, वाल्मिक सिनगर, अजित सिनगर, चेअरमन रंगनाथ नाना सिनगर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर, माजी चेअरमन अनंत तात्या सिनगर, व्हा.चेअरमन दिनकर सिनगर, संचालक रावसाहेब सिनगर, यात्रा कमिटीचे दादाभाऊ बोर्डे, विजय सिनगर, दादाभाऊ नाईकवाडे, संतोष सिनगर, अच्युत सिनगर, गोरख गलांडे, धोंडीराम धट, बाबासाहेब मंचरे, अनिल मंचरे, शंकर पवार यांच्यासह भोजडे यात्रा कमिटी, भोजडे ग्रामपंचायत व भोजडे सोसायटी‘तील सर्वं सदस्य यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सर्वं भोजडे ग्रामस्थांनी पंचक्रोशी आणि आलेल्या सर्वं नामांकित मल्लांचे आभार मानले.