Homeराहुरीराहुरी येथे “छत्रपतींच्या” परिसरात राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न.

राहुरी येथे “छत्रपतींच्या” परिसरात राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न.

संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
सोमवार ६ जून रोजी “छत्रपती चौक” राहुरी येथे “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील नागरिक संकटात सापडलेले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखिल संकटांवर मात करत रयतेच्या मनातील स्वराज्य स्थापन केले.याचीच प्रेरणा घेऊन कोरोंना सारख्या आजाराविरुद्ध लढण्याची जिद्द स्वराज्यातील प्रजेला मिळावी या हेतूनं राज्याभिषेक सोहळा ६ जून २०२१ साली राहुरीत प्रथम वर्षी सुरवात करण्यात आला.शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानंतर अखंड स्वराज्याचे पहिले राजे झाले.हा आनंदाचा क्षण अजरामर झाला.या उत्सवाचे महत्व येणार्‍या पिढीला कळावे या उद्देशाने ज्या परिसराला “छत्रपतींच्या” नावाने ओळखले जाते अशा “छत्रपती चौक” या ठिकाणी मराठा बहूऊद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण, शिवराज्याभिषेक सोहळा कमिटी राहुरी तालुका यांच्या वतीने कार्यक्रमास सुरवात करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी संगितले.

      यावेळी सकाळी १० वा. शास्त्रयुक्त पाठणात जिजाऊंच्या लेकी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंच धातूच्या मूर्तीस पंचामृताचा अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले.स्वराज्याचे निशाण भगवा ध्वज उभारून वंदन करण्यात आले.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.या प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा राजश्री घाडगे,प्राजक्ता वाघ,शेजल ढेप,सुनंदा दहातोंडे, प्रतिभा घाडगे,भारती तनपुरे, ज्योती नालकर,अर्चना ढेपे, वैशाली शेळके,दिपाली अडसुरे आदी उपस्थित होत्या.प्राजक्ता वाघ यांनी सिहं गर्जना म्हंटली.  

       यावेळी मराठा एकीकरण समितीचे समन्वयक मच्छिंद्र गुंड म्हणाले कि,रायगड येथे राज्याभिषेक सोहळ्यास सर्व शिवशंभू प्रेमींना जाने शक्य नसते त्यामुळे छत्रपती चौक राहुरी येथे मोठ्या स्वरुपात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

      यावेळी शिवराज्याभिषेक सोहळासमितीचे अध्यक्षा सौ.राजश्री घाडगे म्हणाल्या की “छत्रपती चौक” राहुरी येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. भविष्यकाळात “छत्रपती चौक” राहुरी येथील सोहळा रायगड नंतर महाराष्ट्रात प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे साजरा केला जाईल असे सौ.घाडगे म्हणाल्या.

या सोहळ्यास श्री.प्रभाकर म्हसे,मा.नगरसेवक नंदकुमार तनपुरे,शेतकरी नेते रवींद्र मोरे, रामदास बोरुडे,डॉ.भारत पैठणे, अड.गोविंद तनपुरे,बंडूशेठ म्हसे, संतोष भूजाडी,अनिल आढाव, देवेंद्र जाधव,संदीप कवाने,राजेंद्र लबडे,संदीप गाडे,अशोक तुपे, शरद म्हसे,मधुकर घाडगे,सलीम भाई शेख,सुखदेव कीर्तने,प्रकाश अरगडे,अविनाश क्षीरसागर, दिनेश झावरे,सतिष घुले,विक्रम गाढे,सागर ताकटे,रविंद्र तनपुरे, विजय कोहकडे,संदीप खाडवे, जिवन गुलदगड,राजंद्र घनवट, भारत टेमक,महेश नेहे,राजेंद्र गाडे,राहुल नालकर आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!