
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
दिव्यांग हृदयसम्राट तथा राज्यमंत्री मा.ना ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांग स्वाभिमान दिन मंगळवार दि.5 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा.गाडगेबाबा आश्रमशाळा राहुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार दिव्यांग क्रांती सेना राज्यध्यक्ष मा.श्री बाबुराव काणे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप दिघे,दिव्याग वित्त महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे साहेब,समाजकल्याण अधिकारी अहमदनगर राधाकिसन देवडे,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे,महिलाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती राहुरी तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिली.
2012 मध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संस्था स्थापन झाली तेव्हा पासून महाराष्ट्रात दिव्यांगासाठी हक्काचे व्यसपीठ तयार झाले, दिव्यांगांनी अनेक आंदोलने करून शासनास वेठीस धरून 56 पेक्षा जास्त शासन निर्णय काढण्यास भाग पाडले.दिव्यांगा च्या न्याय हक्कासाठी कडु साहेबांनी मोठा लढा देऊन दिव्यांगांप्रती पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून दिव्यांगांना स्वाभिमानाने जगणे शक्य झाले, म्हणूनच राहुरी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने ” दिव्यांग स्वाभिमान दिन उत्सव ” साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व दिव्यांगांनी या उत्सवात सहभागी व्हावे अशी विनंती उत्सव समिती अध्यक्ष बाबूराव शिंदे सर, उपाध्यक्ष जालिंदर भोसले, खजिनदार रवींद्र भुजाडी यांनी केली आहे.
दिव्यांग स्वाभिमान दिनाचे औचित्य साधून यात प्रामुख्याने रक्तदान शिबीर,आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर,दिव्यांग मार्गदर्शन शिबीर,पाच दिव्यांगाना तीन चाकी सायकल व विविध दिव्यांग साहित्य वाटप करण्यात येणार आहे,त्याचबरोबर विविध संघटनेच्या अध्यक्षांचा व राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यातील ज्या प्रहार दिव्यांग शाखांनी उत्कृष्ट प्रकारे सामाजिक काम,दिव्यांग हिताचे काम केलेले आहे त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारचे स्वरूप : – पहिला पुरस्कार 5,000 हजार रूपये व स्मृतिचिन्ह,दुसरा पुरस्कार 4,000 हजार रुपये व स्मृतिचिन्ह आणि तिसरा पुरस्कार 3,000 हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. येणाऱ्या सर्वांसाठी गॅलॅक्सी ऑथोपेडीक्स सेंटर संचालक डॉ.तन्वीर देशमुख यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.