HomeUncategorizedश्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक तलवारबाजी दिन उत्साहाने संपन्न

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक तलवारबाजी दिन उत्साहाने संपन्न

भारताच्या भवानी देवी या महीला खेळाडूने २०२० टोकियो आॕलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

संपादक – राजेंद्र तासकर

   कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १०सप्टेंबर हा दिवस "जागतिक तलवारबाजी  दिन "म्हणून उत्साहाने संपन्न झाला. 
             श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात तलवारबाजी खेळाचे साहीत्य पुजन मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले. उपमुख्याध्यापकआर.बी.

गायकवाड,पर्यवेक्षक यु.एस. रायते मॕडम या प्रसंगी उपस्थित होते.
तलवारबाजी हा खेळ सन १८९६च्या आधुनिक आॕलिपिंक पासुन ते टोकीयो २०२० आॕलिपिक पर्यत खेळला गेला.
अहमदनगर जिल्ह्यात शालेय स्तरांवर या खेळाची सुरुवात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत सन १९९९पासुन झाली.आजपावेतो जिल्हा पातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यत अनेक विदयार्थी याविदयालयांतुन घडले.अशी माहीती विदयालयांचे क्रीडाशिक्षक निलेश बडजाते यांनी दिली. शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके व त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे एस.डी.गोरेसर यांनी केले.
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,आदीनी जागतिक तलवारबाजी दिनानिमित्तानं क्रीडाशिक्षक व खेळाडूंना शुभेच्छा दील्या.
या कार्यक्रमाला एन.के. बडजाते,आर.आर.लकारे,ए.बी. अमृतकर,जी.एस.पडवळ,आदी शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.
शेवटी डी.पी.कुडके सर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!