
लोकसभा संवाद मेळावा कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यात केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचा संजीवनी उद्योग समूहाचे वतीने भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,दु,सऱ्या छायाचित्रात मंत्री पटेल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आदी.

जलजीवन मिशनसाठी २७७ कोटी
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ७१ ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनांसाठी २७७ कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान मोदींनी दिला,पण येथील विरोधी लोकप्रतिनिधी त्याचे फुकटचे श्रेय लाटत आहे,हे बरोबर नाही.त्यांनी मोदींची छबी लावुन प्रत्येक मतदारांपर्यंत सांगायाचे धाडस दाखवावे असे मंत्री प्रल्हादसिंग पटेल म्हणाले.
संपादक – राजेंद्र तासकर
भारतीय जनता पक्ष शिस्तीला महत्व देतो,येथे कार्यकर्ता महत्त्वाचा,मंत्री-पद हे नंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा जो मंत्र दिला आहे तो पुढे घेऊन जायचा आहे,देशाला त्यांनी काय दिले हे बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांनी स्वतंत्र यादी करून प्रत्येक घरा-घरात त्याचा प्रसार करून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, आम्ही श्रेयासाठी नाही तर विकासाला महत्व देतो,सत्य काय आहे ते जनतेला सांगा असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती व अन्नसुरक्षा राज्यमंत्री नामदार प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.
लोकसभा प्रवास संवाद मेळावा शनिवारी कोपरगांवयेथील कलश मंगल कार्यालयात झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी प्रास्तविकात केंद्र व राज्य शासनाने कोपरगाव विधानसभा मतदार संघात केलेल्या कामांची माहिती दिली. संजीवनी उद्योग समूह,कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने मंत्री पटेल,विखे यांच्यासह सर्व उपस्थितितांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक मंडळ,रवींद्र बोरावके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मतदार संघातील शेतकरी,भाजपचे विविध सेलचे प्रमुख तसेच दिव्यांग पदाधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाल्याचे मंत्री पटेल यांना सांगितले.
मा.ना.प्रल्हादसिंग पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या आढाव्याला कोकमठाण येथील जंगलीदास माऊली आत्मा मालिक,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी धार्मिक स्थळाला भेटी देऊन संतांचे आर्शिवाद घेत सुरुवात केली.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली युवकांची भव्य मोटारसायकल रैली शहरातून काढली त्यात मंत्री प्रल्हादसिंग पटेल स्वतः मोटारसायकल चालवत सहभागी झाले.छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.
राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की,मागील महाविकास आघाडी शासनाने सामान्यांना आधार वाटेल असे कुठलेही ठोस निर्णय घेतले नाही.माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब तुमची जबाबदारी हाच एकच उपक्रम राबविला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ४० पैकी ४५ प्लस, मिशन हाती घेतले असुन ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी झटुन कामाला लागावे.कोपरगांव विधानसभा निवडणुकीतही किंतु परंतुला महत्व न देता भारतीय जनता पक्षाचाच आमदार निवडून आणण्याची ग्वाही देत त्यांनी पुढच्या सहा महिने ते वर्षभराच्या काळात निळवंडे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला मिळेल यासाठी शिंदेफडणवीस सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे.
श्री.प्रल्हादसिंग पटेल पुढे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल ही घोषणा केली होती ती प्रत्यक्षात अंमलात आली आहे.राज्यात २०१९ मध्ये ४८ टक्केच जनतेला थेट प्यायला पाणी होते;ते २०२२ मध्ये ६४ टक्क्यावर पोहोचले आहे हे कशाचे प्रतिक आहे.’स्वच्छ भारत यातही चांगले काम सुरु आहे.२०३० मध्ये महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करतांना जगात भारत देशाची प्रतिमा स्वच्छतेत उंचवावयाची आहे. भारतीय जनता पक्ष वर्तमान आणि भविष्य आहे.अमृत महोत्सवी स्वातंत्रसंग्राम तिरंगा प्रत्येक घरावर शोभून दिसला. जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी पंतप्रधानांनी आपल्या खांद्यावर टाकली त्याला पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपाच्या विकासाचा संवाद कार्यकर्त्यांनी करावा त्यातून सर्वांचे भले करण्याची प्रतिज्ञा घ्या,जे कमकुवत बुथ आहेत ते निवडा,केलेल्या कामांची स्वतंत्र यादी करा,ती घरा घरात जाऊन सांगा,त्यातून प्रत्येक मतदाराचा विश्वास संपादन करा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार राहुल आहेर,शिर्डी लोकसभा संयोजक नितिन दिनकर,भाजपा उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र गोंदकर,तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष दत्ता काले, दिपक चौधरी,भाजपाचे प्रांतिक सदस्य रविंद बोरावके,माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, बाळासाहेब नरोडे,दिलीप दारूनकर,भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. वैशाली साळुंके,रिपाईचे राज्य सचिव दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,सौ. किरण महावीर दगडे,राजश्री कोलपकर,योगिराजसिंग परदेशी, समाज माध्यमचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे,कैलास खैरे, संचालक विश्वासराव महाले, साहेबराव कदम,केशवराव भवर, शरद थोरात,विलासराव वाबळे, ज्ञानेश्वर परजने,मनेष गाडे, बापूसाहेब बाराहाते,ज्ञानेश्वर होन, बाळासाहेब वक्ते,रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे,संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे,कैलास माळी,प्रदीप नवलेेेे,मच्छिंद्र टेके, विजय वाजे,बबलू वाणी,स्वप्नील निखाडे,फकीरराव बोरणारे, कानिफनाथ गुंजाळ,युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक,बूथ प्रमुख,शक्ति केंद्र प्रमुख कार्यकर्ते, संजीवनी उद्योग समूहाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी आजी-माजी संचालक,भाजपाचे सर्व सेलचे प्रमुख अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाधिकारी,अल्पसंख्यांक सेलचे सर्व प्रमुख,महिला बचत गटाचा भगिनी,संजय युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होतेे,शेवटी युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी आभार मानले.