Homeकोपरगावसमताच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील शाळांना भेट देऊन केली शैक्षणिक व सांस्कृतिक देवाण -घेवाण...

समताच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील शाळांना भेट देऊन केली शैक्षणिक व सांस्कृतिक देवाण -घेवाण -कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

       समता इंटरनॅशनल स्कूलने इजिप्त मधील एसीआयसी (ACIC) अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलसोबत सांस्कृतिक व शैक्षणिक देवाण-घेवाण करत ऐतिहासिक करार करण्यात यश मिळविले.तसेच सहलीद्वारे समताच्या विद्यार्थ्यांनी इजिप्त या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या देशाला आणि भविष्याचे वेध लागलेल्या व आधुनिकतेकडे कल असलेल्या दुबई या देशाला एकत्रित रित्या भेट देऊन इतिहास आणि भविष्याची सांगड घातली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सहलीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव अनुभवायला मिळाले असल्याचे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.
          समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची इजिप्त, दुबई आंतररष्ट्रीय शैक्षणिक सहलीचे आयोजन २६ मार्च ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान करण्यात आले होते.सहलीच्या परतीच्या प्रवासानंतर त्या बोलत होत्या.

पुढे म्हणाल्या की,समता इंटरनॅशनल स्कूल हे सर्व गुण संपन्न विद्यार्थी केंद्रित शाळा म्हणून महाराष्ट्रात ओळखली जात आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अभ्यास क्रमासह वेगवेगळ्या योजना,उपक्रम राबवत असतात.समताच्या नावातील इंटरनॅशनल या शब्दाप्रमाणे समताच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल स्तरावर स्वतःचे उज्वल भविष्य घडवावे. यासाठी समता इंटरनॅशनल स्कूल सतत प्रयत्नशील असते.त्या साठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलींचे आयोजन करत असते. त्यामुळे समताचा विद्यार्थी हा त्या देशातील शैक्षणिक,ऐतिहासिक, धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक , आर्थिक दृष्टीने केलेला अभ्यासाचा प्रत्यक्षात अनुभव घेत असतो.त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहली समताच्या विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान वाढविण्याऱ्या आहे.
इजिप्सियन शाळांना भेट दिली असता भारतीय शाळांमधील शैक्षणिक धोरण आणि इजिप्सियन शाळांमधील शैक्षणिक धोरण याबाबत चर्चा केली. तसेच जगातील सात आश्चर्यांपैकी एक प्रसिध्द पिरॅमिड ऑफ गिज्जा,स्फिंक्स व्हॅली,जगातील सर्वात लांब नाईल रिव्हर,मोतांजा पॅलेस, काटा कॉम ऑफ एल शोकाफा,जगातील सर्वात मोठी अलेक्झांड्रिया लायब्ररी,इजिप्त मधील म्युझियम या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. तर दुबई शहराचीसफर करताना शहरातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती घेत दुबईतील बुर्ज खलिफा,ग्लोबल व्हिलेज,मिरॅकल गार्डन,एक्वेरियम, फाऊंटन शो अनुभवला.अबुधाबी फेरारी वर्ल्डला भेट देऊन तेथील राईडचा आनंद घेतला.या सहली दरम्यान समताचे विद्यार्थी ईशान कोयटे,देशना अजमेरा, माही संचेती,अर्णा कुंकूलोळ,भक्ती न्याती यांनी इजिप्सियन शाळांमध्ये मनोगत व्यक्त करून भारतीय संस्कृती विषयी माहिती दिली.
समताच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीचे गाईड श्री.देवेंद्र सासणे, स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक श्री.संदीप कोयटे,प्राचार्य सौ.हर्षलता शर्मा, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार आदींसह शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!