Homeकोपरगावसार्वजनिक वाचनालय कुंभारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी. जयंती उत्साहात...

सार्वजनिक वाचनालय कुंभारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी. जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

    तालुक्यातील कुंभारी येथील सार्वजनिक वाचनालयामध्ये राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती दि.१४ एप्रिल २०२३रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
       प्रथम प्रमुख मान्यवर माहेगाव देशमुख येथील श्री. किरण देशमुख( सीए) यांच्या हस्ते व धम्मप्रसारक भगवान खळे व विकास खळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
        यावेळी किरण देशमुख(सीए),नारायण वहाडणे, वाचनालयाचे अध्यक्ष रमण यादव गायकवाड पत्रकार संजय भारती,वसंत माधव पवार,भगवान खळे,विकास खळे, भाऊसाहेब पवार,वाचनालयाचे सचिव यशवंत गायकवाङ आदि उपस्थित होते.
        यावेळी श्री.किरण देशमुख (सीए) यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,आपल्या संपूर्ण भारत देशाला समाजातील दुर्बल,वंचित,उपेक्षित बांधवांनाआत्मसन्मान, समानतेची संधी मिळवून दिली व सर्वांना ताठ मानेन जगण्याची ताकद निर्माण करून दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतासारख्या सर्व धर्मीय देशाला एका माळेत गुंफण्याचे कार्य घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
     कार्यक्रमाचे शेवटी वाचनालयाचे सचिव यशवंत गायकवाड यांनी मान्यवरांचे यथोचित सत्कार करून  सांगता करण्यात आली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!