Homeकोपरगावकोपरगांवच्या दर्शना पवारची स्पर्धात्मक परिक्षेत भरारी-देवराम देवकर

कोपरगांवच्या दर्शना पवारची स्पर्धात्मक परिक्षेत भरारी-देवराम देवकर

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीचे सभासद व कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय पवार यांची कन्या कुमारी दर्शना हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वन खात्यात रापत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबददल तिचा अध्यक्ष देवराम देवकर,उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

         मुलांमध्ये कष्ट करण्याची तयारी,जिदद,चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात.कोपरगावच्या दर्शना दत्तात्रय पवार या मुलीने स्पर्धात्मक परिक्षेतुन उत्तुंग भरारी घेतली असे प्रतिपादन अध्यक्ष देवराम केदू देवकर यांनी केले.
             तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीचे सभासद व कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय दिनकर पवार यांची कन्या कुमारी दर्शना हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन करून तिची वन परिक्षेत्र खात्यात राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबददल तिचा शुक्रवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. 
         प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम नामदेव उगलमुगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.श्री.देवराम देवकर पुढे म्हणाले की,माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्पर्धात्मक परिक्षेत ग्रामिण भागातील मुला मुलींचा सहभाग वाढावा यासाठी विशेष अभियान राबविले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वतोपरी मदत देवुन त्यास सतत प्रोत्साहन दिले. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबरोबरच अन्य स्पर्धात्मक परिक्षा यशासाठी पायाभूत सुविधा वाढवून तज्ञ व अनुभवी व्यक्तीकडुन मार्गदर्शन व सुसज्ज ग्रंथालये निर्माण केली आहे. 
        सत्कारास उत्तर देतांना दत्तात्रय पवार म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मुलींने यश मिळविले तर वन परिक्षेत्र राजपत्रीत अधिकारी दर्शना दत्तात्रय पवार म्हणाल्या की,ग्रामिण भागातील मुला मुलींनी जिदद चिकाटी ठेवुन अभ्यास करावा.सभोवताली घडणा-या सामान्यज्ञानावर भर द्यावा,लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुन जनसेवेचा वसा घेता येतो.अपयशाने खचून न जाता सातत्य ठेवा यश हमखास मिळते.
       याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री विलास कहांडळ, साईनाथ तिपायले,उत्तम शेळके,सुभाष होन,सुरेश मगर, आण्णासाहेब पगारे,केशव बटवाल यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मानले. 



     
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!