Homeकोपरगावनाशिक जिल्ह्यातील दहिवड ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे कोपरगावात स्वागत

नाशिक जिल्ह्यातील दहिवड ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे कोपरगावात स्वागत

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

नाशिक जिल्हयातील दहिवड येथुन ह. भ.प.वैकुंठवासी रामदास बाबा यांच्या प्रेरणेने पंढरपूर दिंडी यंदा ह.भ.प. समाधान महाराज यांच्या मार्गदर्शना खाली निघालेल्या दिंडीचे कोपरगाव येथे स्वागत करण्यात आले.

पंढरीच्या वाटेवर कोपरगाव येथे डॉ. राजेश माळी परिवाराने पांडुरंगाच्या भक्तांच्या सहवासात व भक्तिमय रंगात तल्लीन होऊन आनंद साजरा केला व त्यांच्यासाठी अल्पोपहार,चहापाण्याचे नियोजन करून स्वागत केले.बंब प्लाझा विष्णू थिएटर जवळ दिंडीचे त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
टाळ मृदंगाचया गजरात,अभंग भजन गात वातावरण भक्तिमय झाले.

दिंडीच्या स्वागतासाठी डॉ.राजेश माळी,सौ.सुवर्णा माळी,डॉ,भास्कर, डॉ.क्षत्रिय होते तर भगवान कांबळे,रवि सं देवकर,गायकवाड,राधिका वडांगळे, ज्योती परदेशी,हेमचंद्र भवर,सलोनी भागवत,सौ शिंदे आदी मान्यवर यावेळी मोठ्या उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!