Homeनाशिकसिन्नरथोर समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या...

थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने… या स्कूलमध्ये विविध स्पर्धा घेऊन यांच्या स्मृतीसअभिवादन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दि.१ ऑगष्ट२०२३ रोजी निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेऊन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहा गावचे सरपंच व स्कूलच्या उपाध्याक्षा सौ.शुभांगी जाधव मॅडम तसेच काळभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.संभाजी जाधव सर व एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यमान प्रिन्सिपल आदरणीय निळकंठ सर तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी -विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

प्रथम संस्थेचे संस्थापक संभाजी जाधव सर व सरपंच सौ.शुभांगी जाधव आणि निळकंठ सर यांच्या हस्ते थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी स्कूलच्या विद्यार्थिनी कू. संस्कृती गाढे व कू.समीक्षा थोरात यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तसेच स्कूलचे विद्यार्थी कायव्या सानप,सम्राज्ञी जाधव,रिया आरोटे आणि स्कूलचे शिक्षक श्री.मुकुंद शिरसाठ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचेअध्यक्ष आदरणीय संभाजी जाधव सरांनी विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन संघर्ष व त्यांनी समाजाप्रती केलेले कार्य यांची थोडक्यात विद्यार्थांना माहिती दिली व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्या सर्वांना पुढे जायचे आहे असे सांगितले.

तद्नंतर निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेऊन सर्वच विद्यार्थ्यांनी थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले व शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!