
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.माजी.राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व कार्याबद्दल दिल्ली दरबारी दखल घेऊन महाराष्ट्र सदन केंद्रीय आरोग्य मंत्री.भारतीताई पवार,शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.सदाशिव जी लोखंडे व हेमंत गोडसे यांच्या शुभहस्ते ७ ऑगष्ट २०२३ रोजी बहुजन सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

माजी.राज्यमंत्री दिव्यांग स्वातंत्र मंत्रालय अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली २०१२ पासून प्रहार दिव्यांग संघटना प्रथम तालुकाध्यक्ष पदी नंतर जिल्हाध्यक्ष व दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या मूलभूत गरजा,दिव्यांग प्रमाणपत्र,रेल्वे पास,संजय गांधी निराधार योजना,दिव्यांगाने स्वातंत्र रेशन कार्ड,अंत्योदय कार्ड या योजना मिळण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन करून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या ज्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचविण्याचे काम आजपर्यंत त्यांनी केले त्याची दखल घेऊन बहुजन ग्रामविकास सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राहुरी तालुक्यातील लाईफ इन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे श्री.धनंजय पानसंबळ व मराठा एकीकरण समिती मराठा बहुउद्देशीय संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे देवेंद्र लांबे पाटील,दुग्ध व्यवसाय क्षेत्रामधील विशेष काम करणारे गणेश भांड,अध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे ह. भ.प.संपत महाराज जाधव यांना ही राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अशोक तनपुरे,रोहित नालकर, प्रशांत खळेकर,संभाजीराव दहातोंडे, अण्णासाहेब म्हसे,जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब,ह.भ.प नानासाहेब महाराज शिंदे, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, सुभाष कोकाटे सर,उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, तालुका महिला अध्यक्षा सौ.छायाताई हारदे,तालुका उपाध्यक तारडे माणिक, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर, दादासाहेब मोरे सर,तालुका सचिव दत्तात्रय खेमनर,सुरेश दानवे, बाबासाहेब मुसळे,संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी,भास्कर दरंदले,बाळासाहेब गांडळ,भरत आढाव,जुबेर मुसानी राजेंद्रआघाव यांनी कौतुक केले. सत्कार मुर्तीनी बहुजन ग्राम विकास संघ यांचे मनापासून आभार मानले.