
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – अज्ञान,अंधश्रद्धा न जोपासता प्रगत विज्ञान दृष्टीकोन ठेवून व विवेक वादाने जीवन जगावे असे विचार स्व.स्वातंत्र्य सैनिक गंगाधर गवारे मामा फौंडेशनचे पुरुषोत्तम पगारे यांनी व्यक्त केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कै.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ स्मृतीला अभिवादन करण्यात आले.दहाव्या पुण्यतिथी निमित्त स्व.स्वातंत्र्य सैनिक गंगाधर गवारे मामा फौंडेशनच्यावतीने कै.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व श्रद्धांजली अर्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम पगारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण डुकरे सर,बाबुराव जाधव,विठ्ठल मैंदड उपस्थित होते.
या प्रसंगी विठ्ठल मैंदड,नारायण डुकरे, मुकबधीर विद्यालयाचे गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पुस्तक प्रकाशन व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील साहित्यिक, वाचनालयाचे वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे बाळनाथ राजगुरू यांनी आभार मानले.