Homeकोपरगावशिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान.सदाशिवजी लोखंडे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश; कोपरगाव...

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान.सदाशिवजी लोखंडे यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश; कोपरगाव नगर परिषदेस…या कामासाठी…. इतका निधी मंजूर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

अलीकडच्या काळात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे,नव्हे नव्हे जणू काही शासनाला त्यांनी चेतावनीच दिली आहे.घरफोडी,गाड्या चोरी, लुटमार,खून,दरोडे,धुमसटाईलने महिलांच्या गळयातील दागिने ओरबाडणे अशा अनेक अवैद्यधंद्याना उधान आले आहे,अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना आपल्याला पहावयास मिळत आहे,या सर्व गोष्टींचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिवजी लोखंडे साहेब यांनी हि बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत याबाबत बऱ्याच दिवसापासून शासनाकडे पाठपुरावा करून,लावून धरल्याने त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.शासनाने यामध्ये ”वैशिष्टयपूर्ण” योजनेअंतर्गत सन २०२३-२४ करीता कोपरगाव नगर परिषदेस एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यांचबरोबर इतर तालुक्यातील नगरपंचायतींसाठी एकूण ४.९० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती खासदार मा.लोखंडे साहेब यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिवजी लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नगरपंचायतींना “वैशिष्टयपूर्ण” विशेष अनुदान योजनेअंतर्गत सन २०२३-२४ वर्षाकरीता कोपरगाव नगरपंचायत हद्दीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्यासाठी एक कोटी वीस लक्ष रुपये निधी मंजुर करण्यास अखेर त्यांना यश आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील कल्पना चावला उद्यान,आदिनाथ वसाहत येथे संगीत कारंजा विकसितकरण्यासाठी दोन कोटी तर सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करण्यासाठी एक कोटी रुपये निधी,श्रीरामपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दीड कोटी, अकोले नगरपंचायत हद्दीत सीसीटीव्ही यंत्रणेसाठी एक कोटी वीस लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आलेला आहे.तसेच श्रीरामपूर येथील संत गाडगेबाबा उद्यानात म्युझिकल फाउंटन संगीत कारंजा विकसित करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी खासदार मा. सदाशिवजी लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडुन मंजूर करून घेण्यात आला आहे,तसे शासनाच्या वतीने ११ ऑगष्ट २०२३ रोजी परिपत्रक ही जारी झाले असून आता लवकरच संपूर्ण कोपरगाव शहरासह अन्य शहरही सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखरेखीखाली येऊन चोरटयांचे भय कमी होणार आहे तसेच पोलीस प्रशासना वरील वाढता तणाव कमी होण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे त्या निमित्ताने कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले व शहर वासीयांच्या वतीने खासदार मा.सदाशिवजी लोखंडे साहेब यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!