
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यातील शहा सारख्या छोट्याशा गावात अल्पावधीतच विविध उपक्रमांतर्गत अनेकानेक बक्षीसे मिळवत नावारुपाला आलेली शिक्षण संस्था म्हणजे एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूल असून,या स्कूलच्या विद्यार्थीनींनी काल झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2024 -25 मध्ये द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.

पांढुर्ली येथे क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका स्तरीय 14 वर्षे आतील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एस डी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने दुसऱ्या क्रमांक पटकावला या वेळी कबड्डी

टीमचे प्रशिक्षक मुरडनर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी संघ कु. अनन्या संदीप हंडोरे,वैष्णवी संदीप घुमरे, सायली ललित निळकंठ,श्रद्धा राजेंद्र काटे,ईश्वरी सचिन थोरात,दिव्या शिवाजी राहणे,ईश्वरी गोरक्षनाथ नरोडे, गायत्री मकरंद गुंजाळ,सानिका रावसाहेब वाणी,सुप्रिया योगेश नरोडे, इत्यादी विद्यार्थिनी सहभागी होत्या. या सर्वांचे स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम एक हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.तसेच संस्थेचे संस्थापक आदरणीय संभाजी


जाधव सर यांनी खेळाडु विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत सर्व खेळाडूंचा व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मुरडणार सर यांचाही शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक मिळविलेल्याने शाळेचा सिन्नर तालुक्यात नावलौकिक वाढविण्यात मोठी भर पडली असल्याचे गौरौद्गार संस्थेच्या उपाध्याक्षा सौ.शुभांगी जाधव यांनी यावेळी काढले व संस्थेची अशीच उत्तोरोत्तर प्रगती होत जावो अशी शुभेच्छा व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.शुभांगी जाधव मॅडम,शाळेचे प्राचार्य श्री निळकंठ सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.