HomeUncategorizedशब्दगंध साहित्यिक परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी हेमचंद्र भवर यांची दुसऱ्यांदा निवड

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी हेमचंद्र भवर यांची दुसऱ्यांदा निवड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – अहिल्यानगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषद (महाराष्ट्र राज्य) हि संस्था महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना प्रेरणास्थान असून, याद्वारे साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवित आहे, महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा असून कोपरगाव शाखेच्या कार्यकारिणीचा नुकताच विस्तार करण्यात आला असून अध्यक्षस्थानी सौ.ऐश्वर्याताई संजय सातभाई यांची एकमताने निवड करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी राजेंद्र (सुधिर) कोयटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून वृत्तपत्र, छायाचित्रकार,साहित्यिक हेमचंद्र भवर यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

जेष्ठ साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे, मंसाराम पाटील,माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ.हिरालाल महानुभाव, आणि तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

या प्रसंगी शाखेच्यावतीने तीन वर्षांत नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी काव्य लेखन स्पर्धा,कार्यशाळा,सन्मान सोहळा, ग्रंथ उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अध्यक्षा सौ. सातभाई व प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर शाखेचा विस्तार वाढविण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी महाविद्यालय, विद्यालय येथे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधून, ग्रामीण भागातील नवोदितांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी शेवटी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!