HomeUncategorized….. यांची तालुका विज्ञान संघटनेच्या सचिव पदी नियुक्ती

….. यांची तालुका विज्ञान संघटनेच्या सचिव पदी नियुक्ती

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोपरगाव शहरातील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील कुलदीप गोसावी यांची कोपरगांव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २० वर्षा पासुन ते कार्यरत असुन
तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.विद्यालयाची सर्व प्रकारची ऑनलाइन कामे ते पाहतात. स्कॉलरशिप,एन एम एम एस परीक्षां मधून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करुन त्यांना यश प्राप्त करून दिले आहे.कोपरगांव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेवर ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.

गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य श्री. डॉ.अमोल अजमेरे,सदस्य श्री.संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे, दिलीप तुपसैंदर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक श्री.रघुनाथ लकारे, पर्यवेक्षक अनिल अमृतकर, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन शेटे,मकरंद कोऱ्हाळकर, न.पा. शिक्षण मंडळाचे श्री.साईश शिंदे,अमित पराई,विदयालयांतील सर्व शिक्षक, शिक्षिका आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!