Homeकोपरगावदिव्यांगांना सन्मान देणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत

दिव्यांगांना सन्मान देणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत

॥ दिव्यांग व्यक्तीचे हस्ते या ग्रामपंचायतीने केले झेंडावंदन॥

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव : -शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यंक्तींना सन्मानाची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तीस सन्मान देऊन ७६ व्या प्रजासत्ताकदिनानिमीत्त श्री. प्रकाश मुरलीधर वैद्य यांच्या हस्ते झेंडावंदन करुन तालुक्यात पहिला मान मिळविला आहे.

सरपंच श्री.प्रदिप चव्हाण व त्यांच्या सर्व सहका-यांनी या अनोख्या पध्दतीने झेंडावंदन करण्याचा उपक्रम सुरू करून तालुक्यात पहिला मान मिळविला आहे.मागील वर्षी इयत्ता दहावी परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडल्याचे सरपंच प्रदिप चव्हाण यांनी सांगितले.

सविस्तर,दुर्बल व वंचित असणाऱ्या घटकास मुख्य समाज प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून,शासनाच्या ध्येय धोरणानुसार तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत ने देशाचा अभिमान असलेल्या पवित्र ध्वजाचे ध्वजारोहन ( झेंडावंदन ) गावातीलच एक दिव्यांग व्यक्तीस सन्मानपूर्वक सहभागी करून घेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन केले. दिव्यांगांप्रती असणारा आदरभाव धोत्रे ग्रामपंचायतचे सरपंच मा. प्रदिप चव्हाण,उपसरपंच आरती राजेंद्र जामदार व सर्व सदस्य तसेच ग्रामअधिकारी यांनी राबविलेला उपक्रम हा सर्वाप्रती प्रेरणादायी आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिन, झेंडावंदनास सरपंच प्रदिप चव्हाण, उपसरपंच आरती राजेंद्र जामदार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे आजी -माजी पदाधिकारी,सुरेश जाधव, सोसायटीचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उर्दू शाळेचे सर्व सहकारी,पालक,माता भगिनी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!