
मुख्य संपादक- राजेंद्र तासकर
कोपरगाव – तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी प्रा.सौ.पल्लवी अरविंद औताडे (मोरे) यांनी विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधा नंतर पि एच डी (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

चंद्ररुप डाकले जैन काॅलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथील केंद्रातून,
“उत्तर महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी साखर कारखान्याच्या संघटन व व्यवस्थापनाचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर प्रबंध सादर केला होता. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.बखळे एस आर, सहाय्यक मार्गदर्शक म्हणून लाभले तर प्रा.डॉ.भागवत ए बी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शोध प्रबंधासाठी प्राचार्या डॉ.व्हि.एन. गुरसळ, डॉ. बारहाते जी एच यांनी मोलाचे सहकार्य केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्यानंतर प्रा. सौ.पल्लवी अरविंद औताडे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून अभिनंदनाचाही वर्षाव होत आहे.