
कोपरगाव:- आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सतत उपलब्ध असणाऱ्या आरोग्यसेवेमुळे एक विश्वसनीय आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये खालील सर्व सुविधा नियमितपणे उपलब्ध आहेत.
▪️आपत्कालीन सेवा (Emergency Services) 24×7 आपत्कालीन रुग्ण सेवा
▪️प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ
▪️ऑक्सिजन सुविधा
▪️अत्यावश्यक औषधे सतत उपलब्ध
▪️ओपीडी (OPD) सेवा जनरल मेडिसिन OPD, बालरोग विभाग, सर्जरी OPD, ऑर्थो OPD, साप्ताहिक स्पेशालिस्ट डॉक्टर भेट.
▪️आयसीयू व क्रिटिकल केअर अत्याधुनिक ICU, व्हेंटिलेटर सुविधा, मॉनिटरिंग सिस्टीम, प्रशिक्षित ICU स्टाफ
▪️नवजात बालकांसाठी प्राथमिक उपचार NICU
▪️ऑपरेशन थिएटर (OT)- पूर्णपणे आधुनिक OT, जनरल व छोटी-मोठी शस्त्रक्रिया सर्व आधुनिक उपकरणांसह निर्जंतुक वातावरण
▪️लॅबोरेटरी (Pathology Lab)- रक्त तपासणी, मूत्र तपासणी, शुगर, हिमोग्लोबिन, युरिक ऍसिड, लिपिड प्रोफाइल इतर सर्व आवश्यक तपासण्या.
▪️एक्स-रे व सोनोग्राफी सुविधा डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी (Ultrasound), कलर डॉपलर सुविधा
▪️औषध वितरण (Pharmacy) -24 तास मेडिकल स्टोअर, डॉक्टरांनी दिलेल्या सर्व औषधांची उपलब्धता
▪️फिरता दवाखाना (Mobile Hospital Service)- ग्रामपातळीवर नियमित आरोग्य तपासणी, बीपी, शुगर, प्राथमिक उपचार, औषध वितरण पूर्णपणे मोफत, गंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका व रेफरल सेवा.
▪️विमा योजनांतर्गत उपचार- महात्मा फुले जनआरोग्य योजना (MPJAY), आयुष्मान भारत योजना पात्र रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार.
▪️रुग्णवाहिका (Ambulance Service)-24×7 उपलब्ध रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी
▪️फिरता दवाखाना – मोबाइल हॉस्पिटल सेवा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांनी एक नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️फिरता दवाखाना – मोबाइल हॉस्पिटल सेवा आता तालुक्यातील विविध गावांमध्ये नियमितपणे सुरू होत आहे. यासाठी हॉस्पिटलमार्फत सुटसुटीत, अत्याधुनिक सोयींनी सज्ज अशी एक विशेष बस नियुक्त करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, परिचारक व प्रशिक्षित चालक अशा संपूर्ण टीमसह ही सेवा उपलब्ध होणार आहे.
▪️मोफत आरोग्यसेवा गावागावात, घराजवळ
▪️या उपक्रमांतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या प्रमुख सेवाः
बीपी तपासणी
शुगर तपासणी
- प्राथमिक उपचार
- आवश्यक औषधे -संपूर्ण मोफत.
▪️गंभीर रुग्णांसाठी रेफरल सुविधा
ग्रामीण, दुर्गम भागातील गरजू, दिव्यांग, वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तपासणीदरम्यान एखादा गंभीर आजार निदर्शनास आल्यास त्या रुग्णाला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये माफक दरात, अल्प दरात, किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनाअंतर्गत मोफत उपचार दिले जाणार असल्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी केले आहे.
गावानुसार वेळापत्रक – आठवड्याला ठरलेल्या दिवशी नियमित सेवा फिरता दवाखाना बस खालीलप्रमाणे प्रत्येक आठवड्यात निश्चित वेळेनुसार गावांमध्ये भेट देणार आहे
- सोमवार रुई -सकाळी १० ते १२
शिंगवे दुपारी १२.३० ते ०२.३०
पुणतांबा – दुपारी ०३ ते ०5.३० - मंगळवार जवळके – सकाळी १० ते १२
बहादरपूर – दुपारी १२.३० ते ०२.३०
सायाळे दुपारी ०३ ते ०5.३० - बुधवारखंबाळा – सकाळी १० ते १२
/kks=s – दुपारी १२.३० ते ०२.३०
खोपडी – दुपारी ०३ ते ०5.३० - गुरुवार सावळीविहिर – सकाळी १० ते १२
कनकुरी – दुपारी १२.३० ते ०२.३०
नांदुर्खी – दुपारी दुपारी ०३ ते ०5.३० - शुक्रवार पिंपळवाडी – सकाळी १० ते १२
एकरखे – दुपारी १२.३० ते ०२.३०
रामपूरवाडी – दुपारी ०३ ते ०5.३० - रविवार दहऽगाव/पिंपळस/केळवड – सकाळी १० ते १२
खडकवाक – दुपारी १२.३० ते ०२.३०
निर्मळ पिंपरी – दुपारी ०३ ते ०5.३०
स्थानिक ग्रामपंचायतींचे सहकार्य अपेक्षित
फिरता दवाखाना सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित गावातील ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन यांचे आवश्यक सहकार्य अपेक्षित असल्याचे हॉस्पिटलने कळविले आहे.
लोकांच्या आरोग्यासाठी एक मोठे पाऊल ग्रामीण भागासाठी वरदान
आत्मा मालिक हॉस्पिटलची ही सेवा ग्रामीण भागातील आरोग्याचे चित्र बदलण्यास मदत. लोकांच्या दारापर्यंत मोफत, दर्जेदार, तत्काळ आरोग्यसेवा पोहोचवण्याचा हा उपक्रम ठरेल. असे ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी सांगितले.