
कोपरगाव :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ धुळे येथे दि.६ डिसेंबर २० २५ रोजी झालेल्या नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या चार जिल्ह्याच्या विभागीय थाळी फेक (पुरुष) स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद तालुका चांदवड जिल्हा नाशिक या विद्यालयात शिक्षक म्हणून रुजु असलेले श्री. सुनिल भागवत चंदनशिव यांनी विभागस्तरीय शिक्षक अधिकारी क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
त्यांनी अथक परिश्रम घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळीं केंद्र प्रमुख, मुख्याध्याक, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विधार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

त्याचबरोबर त्यांची कोल्हापूर येथे होण्याऱ्या राज्यस्तरीय शिक्षक अधिकारी स्पर्धेसाठी निवड होऊन त्यांना तसे डॉ. जयश्री पाटील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व Nasik Diet College च्या वरिष्ठ आधीव्याख्याता श्रीमती सुचेता पाटील मॅडम यांच्याकडून नियुक्ती पत्रक ही देण्यात आले.
सुनील चंदनशीव सर यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशिसह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.