Homeकोपरगावब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा

ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा

कोपरगांव :-तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत श्री रामदासी महाराज यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमीत्त दासबोध पारायण ५ ते १२ जानेवारी २०२६ पर्यंत आयोजीत करण्यांत आले असल्याची माहिती समस्त रामदासी बाबा भक्त मंडळ, व भजनी मंडळ तिर्थक्षेत्र कोकमठाण येथील गांवक-यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली.

१२ जानेवारी रोजी ह. भ. प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर (उंबरगांव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या पुण्यतिथी सोहळयाची सांगता होईल.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ दासबोध पारायण, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ व रात्रौ ७ ते ९ दासबोध पारायण निरूपण व जागर याप्रमाणे दैनदिन कार्यकम होणार आहे. दासबोध निरूपण सोहळयासाठी सिंथेसायजर हभप अरूणभैया पगारे, तबला विशारद ह भ प संदिप महाराज वैद्य यांची साथ लाभणार आहे.

५ जानेवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प पू रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलश व ग्रंथ पुजनाने या पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ होत आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप तुकाराम महाराज वेलजाळे हे काम पहाणार आहेत.

योगतज्ञ ह.भ.प. दामोदरबुवा प्रकाश रामदासी (५ व ६ जानेवारी), भागवतकार ह.भ.प. सर्वेशबुवा शुक्ल महाराज (७ व ८ जानेवारी), समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी (९ ते १२ जानेवारी) कण्हेरी मठ साताराचे मठाधिपती समर्थभक्त उल्हास महाराज गोसावी यांची किर्तने होतील. ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यांत येणार आहे.

या सप्ताह काळात समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती, स्वामी शिवानंदगिरी महाराज (मंजुर), जंगलीदास माऊली, रामानंदगिरी महाराज (पुणतांबा), परमानंद महाराज, भगवतानंदगिरी महाराज (कोकमठाण), राघवेश्वरानंदगिरी महाराज (कुंभारी), महेंद्रपुरी महाराज (हनुमान टेकडी), मुकुंद महाराज (भगुरकर), श्रध्दानंद महाराज (महांकाळ वाडगांव), विठठलानंद महाराज (कारवाडी), आदि संत- महंतांची प्रामुख्यांनी उपस्थिती राहणार आहे.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कोकमठाण येथील रामदासी महाराज भक्त मंडळ प्रयत्नशिल आहेत. १२ जानेवारी रोजी रामदासी महाराज समाधीस्थानावर सौ. कल्पना व कैलास बबनराव वाघ या उभयतांच्या हस्ते लघु रुद्राभिषेकाचे सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आयोजन करण्यांत आले आहे. तेंव्हा भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!