Homeकोपरगावकोपरगाव तालुका कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अतुल कोताडे यांची निवड जाहिर

कोपरगाव तालुका कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अतुल कोताडे यांची निवड जाहिर

कोपरगाव : – कोपरगांव तालुका कला अध्यापक संघाची नुकतीच सहविचार सभा मा. गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांच्या उपस्थित संपन्न झाली. या मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे कला शिक्षक श्री. अतुल कोताडे यांची कोपरगाव तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली.

या कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणुन श्री अविनाश भोसले तर खजिनदार म्हणुन श्री ज्ञानेश्वर परशुराम राठोड आणि उपाध्यक्ष म्हणुन श्री. मतीन मोहम्मदसाद दारूवाला आणि श्री. ज्ञानेश्वर साहेबराव पर्वत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी कोपरगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविण निळकंठ, कोपरगांव तालुका कला शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच बहुसंख्य कला शिक्षक उपस्थित होते.

या सर्वाचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!