
कोपरगाव : – मकर संक्रांत हा गोडव्याचा आणि सकारात्मकतेचा सण, नवे विचार नवी ऊर्जा आणि गोड शब्दांची सुरुवात म्हणजे ” मकर संक्रांत ” शाळेच्या प्रांगणात नटून थटून सुंदर पारंपारिक नऊवार साडी नेसून नाकात नथ घालून इवल्याच्या चिमूरड्या औक्षण करण्यासाठी तसेच हळदीकुंकू व तिळगुळ देण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी उभ्या राहिल्या.

शाळेचा संपूर्ण परिसर तसेच वातावरण चैतन्यमय झाले होते. आनंदाचे डोही आनंद तरंगे. माता पालकांची प्रचंड गर्दी या समारंभाच्या निमित्ताने दिसली. या उत्साहात अजून एक भर पडली ती पालकांच्या मेहंदी स्पर्धेची. खूपच उत्साहाने पालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला व पारितोषिके पटकावले.

प्रास्ताविकामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर म्हणाल्या की, सीबीएससी पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी बेसवर शिक्षण दिले जाते. दररोज नवीन नवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी स्वतःच स्वतः शिकत जातो. अप्रगत मुलांचे जादा तास नियमित शाळेत घेतले जातात. तसेच यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी बसलेले आहे .एकंदरीत शाळेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पालक समाधानी आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. उमा कौस्तुभ भोईर उपस्थित होत्या. त्यांनी वस्तूंचे वाण देण्याऐवजी आयुर्वेदातील महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना व पालकांना वाण म्हणून दिल्या व त्यांच्या ज्ञानात भर घातली. आपल्या वक्तव्यात त्या बोलताना म्हणाल्या की, मुलांना सारख्या सूचना देऊ नये कृतीतून समजावून सांगावे. जेवताना मोबाईल टीव्ही याचा वापर करू नये. ताटात जे जेवण आहे ते आनंदाने ग्रहण करावे. माता पालकांची एकाग्रता टिकून राहण्यासाठी काही विनोदी खेळ देखील त्यांनी घेतले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांसाठी 5 S त्यांनी सांगितले .त्यातील पहिला S म्हणजे Sit बसण्याची पद्धती. दुसरा S म्हणजे see जेवणाच्या ताटाचे निरीक्षण करा. तिसरा S म्हणजे smell and savor चवीचा आनंद घ्या .चौथा S म्हणजे slowly chew हळुवार चावा. पाचवा S म्हणजे simply and smile साधे आणि स्मित हास्य करत आनंदाने जेवण घ्या. अतिशय सुंदर व गोष्टीच्या रूपात विद्यार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्ष व कोपरगावच्या गाणं कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सुधा भाभी ठोळे यांनी आपल्या गोड वाणीतून ए मालिक तेरे बंदे हम हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला कोपरगाव नगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेविका सोनल अमोल अजमेरे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे प्रिया ठोले, अर्चना अजमेरे , शोभा अजमेर, रेखा अजमेरे शोभना ठोळे, रिता अजमेरे, योगिता लासलकर, उज्वला रणशूर , वर्षा शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचलन वृषाली जावळे यांनी केले तर आभार अनिता लव्हाटे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.