
संपादक -राजेंद्र तारकर
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील काशिनाथदादा लोणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत तुकाराम संवत्सरकर तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब कारभारी आढाव यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे,संजीवनी उद्योगसमूहाचेअध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले.
यशवंत संवत्सरकर यांच्या नावाची सूचना श्रीकांत केरू संवत्सरकर यांनी आणली व भावलाल कारभारी कुऱ्हे यांनी अनुमोदन दिले.
या निवडीनंतर सभागृहामध्ये सभा घेण्यात आली त्या सभेसाठी गावातील ज्येष्ठ राजेंद्र काशिनाथ लोणारी,कोल्हे कारखान्याचे तज्ञ संचालक मच्छिंद्र लोणारी,माजी सरपंच यादवराव संवत्सरकर,रंगनाथ संवत्सरकर,एकनाथ नाना संवत्सरकर,भीमा सोमनाथ संवत्सरकर,अरविंद संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ,काशिनाथ आढाव,प्रशांत आढाव,रामभाऊ संवत्सरकर पहिलवान त्याचप्रमाणे सोसायटीचे सचिव रामदास शिंदे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला,भाऊसाहेब बाळकृष्ण संवत्सरकर यांनी त्यांना या कामात मदत केली, दामू संवत्सरकर,सुनील शिंदे यांनी आभार मानले.