Homeकोपरगावमाजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडुन एकता अखंडता भाईचाराची शिकवण -विवेकभैय्या कोल्हे

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडुन एकता अखंडता भाईचाराची शिकवण -विवेकभैय्या कोल्हे

शहरातील जुनी मामलेदार कचेरी पांडेगल्ली परिसरात रमजान सणानिमीत्त मुस्लीम बांधवासाठी इफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मुस्लीम बांधवांना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.

संपादक -राजेंद्र तासकर
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने एकता,अखंडता,भाईचाराची शिकवण देत सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले असुन त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन भाईचाराची शिकवण अधिकाधिक बळकट करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
शहरातील जुनी मामलेदार कचेरी पांडेगल्ली परिसरात रमजान सणानिमीत्त मुस्लीम बांधवासाठी इफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतांना ते बोलत होते.
प्रारंभी माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी मुस्लीम समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली.माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले की,मुस्लीम बांधवामध्ये रमजान पवित्र सणाला विशेष महत्व आहे.संपुर्ण महिनाभर मुस्लीम समाज कडक उपवास करून मनाबरोबरच शरीराची शुध्दी वाढवत असतात.अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान म्हणाले की,माजीमंत्री शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी शहर विकासाबरोबरच मुस्लीम समाजाच्या प्रगतीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करून कोटयावधी रूपयांचा विकास निधी केंद्र व राज्य शासनाकडुन आणलेला आहे.
श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,कुरआन शरीफ नुसार इस्लामी शरीयत कायदा तयार झाला असुन त्यानुसार मुस्लीम बांधव आचरण ठेवत असतात.रमजान रोजा उपवासात एक वेगळी ताकद असुन प्रत्येक जाती धर्मातील व्यक्ती आपल्या रूढी परंपरेनुसार आचरण ठेवत असतात.एकोपा भाईचारा हा सर्वाच्या प्रगतीसाठी महत्वाचा दुवा आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री.कैलास जाधव,अतुल काले,भरत मोरे, असलम शेख,बबलु वाणी,दत्ता काले,खालीकभाई कुरेशी,सनी वाघ,स्वप्नील निखाडे,विवेक सोनवणे,पप्पु पडीयार,अनिल जाधव,विनोद राक्षे,संदिप देवकर,अहमदभाई बेकरीवाले, रंजन जाधव,जनार्दन कदम, रविंद्र कथले विक्रमादित्य सातभाई,फकीर महमद पहिलवान,अकील सय्यद, मुजाहिदभाई सययद,मकसुद अत्तार,बबलु अत्तार,शकील अत्तार,जितेंद्र रणशुर,कुणाल लोणारी,रविंद्र रोहमारे,गोपिनाथ सोनवणे,बाजीराव निकम,नरेंद्र लकारे,देवराम पगारे,बंटी पांडे, अंकुश जोशी,किरण सुपेकर, चंद्रकांत वाघमारे,सुशांत खैरे, छोटुभाई पठाण,आयूब पठाण, सलीम अत्तार अब्बास मनियार, शौकत शेख,अमन मनियार, निखील जोशी,अशीश निकुंभ, अरूण शेख,मुन्ना मन्सुरी, विष्णुपंत गायकवाड,दत्ता कोळस्कर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक,नगरसेविका, कार्यकर्ते,प्रतिष्ठित नागरिक, मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

     
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!