Homeकोपरगावकोपरगांवात २७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन-विवेकभैय्या कोल्हे

कोपरगांवात २७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन-विवेकभैय्या कोल्हे

संपादक -राजेंद्र तासकर
संजीवनी युवा प्रतिष्ठाण आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने कोपरगाव येथे २७ मे २०२२ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
श्री.विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की,संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने कोपरगांव मतदार संघाच्या विकासात सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा संजीवनी युवा प्रतिष्ठाणने उचलला असुन त्या माध्यमातुन जनसामान्यांच्या अडी अडचणीत सहकार्याचे अमुल्य योगदान सर्व संजीवनी सेवक देत असतात.या सामाजिक उत्तरदायित्वातुन कोपरगांव येथे २७ मे २०२२ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन ज्या वधु वराचा विवाह या सामुदायीक सोहळ्यात करावयाचा आहे त्यांचा वयाचा दाखला,आधार कार्ड झेरॉक्स,रहिवासी दाखला, वधु वरांचे दोन फोटो,रेशनकार्ड झेरॉक्स,पालकांचे संमतीपत्र या कागदपत्रांसह मा.आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे संपर्क कार्यालय,गुरुद्वारा रोड, कोपरगाव येथे तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७७२१०९२१२१ वर संपर्क साधावा,ज्या वधु वरांचा वयाचा दाखला नसेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिका-यांचा वयाचा दाखला आणावा व जास्तीत जास्त इच्छुकांनी नांव नोंदणी करावी असे आवाहन शेवटी विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!