Homeकोपरगावआमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या शपथविधीने संजीवनी कार्यस्थळावर जल्लोष.

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या शपथविधीने संजीवनी कार्यस्थळावर जल्लोष.

कोपरगांव :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या शपथविधीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि.१४ मे २०२६ रोजी जल्लोष साजरा करण्यांत आला.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोटयातुन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदारपदी वर्णी लावली त्या शपथविधी सोहळयाचे थेट प्रक्षेपण गुरूवारी संजीवनी कार्यस्थळावर दाखविण्यांत आले. याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक टी. आर. कानवडे, मुख्य सीईओ शिवा कुमार, कामगार नेते मनोहर शिंदे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कारखान्याचे सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, विविध विभागाचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यांत आले.

थेट प्रक्षेपणांत शपथविधीसाठी ज्यावेळी सचिव डॉ विलास आठवले यांनी युवानेते विवेक कोल्हे यांचे नावाची घोषणा केली त्यावेळी कारखाना सभागृहात टाळयांच्या कडकडाटात एकच जल्लोष करण्यांत आला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली त्यावेळी हर्षउल्हास करण्यांत आला. आमदार विवेकभैय्या कोल्हे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यांत आल्या. कामगार नेते मनोहर शिंदे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते नातवाने पुर्ण केले. आमदार विवेकभैय्या कोल्हे हे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मुशीतुन तयार झालेले नेतृत्व आहे. शेती सहकार सिंचन, बँकींग, महिलासबलीकरण, युवक, सामाजिक, सांस्कृतिक, आदि क्षेत्राचा आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा गाढा अभ्यास आहे. प्रश्न समजुन घेवुन ते सोडविण्याची हातोटी त्यांना ज्ञात आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक यांनी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे अभिनंदन केले.

बाबासाहेब गांगुर्डे व वसंत थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!