
कोपरगाव :- आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकुल विद्यालयाने सलग पाचव्या वर्षी आपला डंका राज्यपातळीवर वाजवीला. रॅशनॅलिस्ट टॅलेंट सर्च परीक्षेत सलग पाचव्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवीला. यंदा या परिक्षेत रितेष लटपटे याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व आरटीएसई फाउंडेशन यांच्यावतीने हि परीक्षा घेण्यात येते.

नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) ः- आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल विद्यालय हे प्रवेश परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यात अव्वल स्थानावर आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षक मेहेनत घेतात.
याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, या परिक्षेत विद्यालयाचा सार्थक शिंदे याने राज्यात तिसरा, स्वराली काळे हीने अहिल्यानगर जिल्ह्यात पहिला, साहिल बोरुडे व वैभवी जाधव हिने दुसरा तसेच कार्तिक शेटे व आयुष वामन याने जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख अनिल सोनवणे, सचिन डांगे पर्यवेक्षक नयना आदमाने, गणेश रासने आणि विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले.